जिल्हा जळगाव ता: चोपडा शिरपूर रस्त्यावर 18 एप्रिल 2026 रात्री बारा वाजेच्या सुमारास गिरीराज लॉन्स येथील पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर चोपडा पोलीस स्टेशन येथे नवीनच नियुक्ती झालेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पहिल्याच दिवशी धडाकेबाज कार्यवाही करून अवैध धंद्यांवर मिळवले नियंत्रण त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कार्यवाही होणार का? अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी अवैध धंद्यावर मोठी कार्यवाही करून बनावट दारूचा कारखाना उद्वस्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास चोपडा शिरपूर बायपास रस्त्यावर अकुलखेडा शिवारात गिरीराज लॉन्स जवळील पत्री शेडमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार पोलीस निरीक्षक व त्यांच्या बरोबर पोलीस सहकारी यांनी कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात तयार झालेली नकली दारू आणि दारूला लागणारे साहित्य जमा केले याप्रकरणी रवींद्र दिनकर पाटील वय वर्षे 42 राजवर्धन संजय पाटील वय वर्ष 30 आणि कपिल संजय पाटील वय वर्ष 32 या तिघांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्यांच्याजवळ असलेले साहित्य मुद्देमाल जप्त केला असून त्यात बनावट दारू बाटल्या तयार करण्यात आलेले बाटलीचे बनावट नवीन झाकण रासायनिक युक्त द्रव्य एकूण 1 लाख 8 हजार रुपये मोटरसायकल असा ऐवत जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य अधिनियम भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी डुबलीकेट दारू तयार करण्याचे कारखाने आहेत याचाही तपास पोलीस घेत आहे नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या पहिल्या दिवशी केलेल्या कार्यवाहीमुळे पोलीस निरीक्षक पवन देसले यांची सर्वत्र चोपडा शहरात आणि जिल्ह्यात सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांवर मोठ मोठ्या कार्यवाया भविष्यात होतीलच असा तर्क पहिल्याच दिवशीच्या कार्यवाहीमुळे होत आहे यामुळे चोपडा येथील प्रत्येक चौका चौकात ही चर्चा सुरू आहे पोलीस निरीक्षक पवन देसले सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे दोन नंबर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे तसे पाहायला गेले तर दारूबंदी विभागात अनेक रिक्त जागा असून त्या जागा भरल्या गेल्या तर डुबलीकेट दारूमुळे लोकांचे जीव वाचतील परंतु दारूबंदी विभागात अनेक वर्षापासून पोलीस भरती का करत नाही नाव फक्त दारूबंदी// आणि दारूबंदी होतच नाही//पाचोरा तालुक्यात ॲडिशनल चार्ज चार ते पाच वर्षापासून आहे// एवढ्या मोठ्या तालुक्यात सुद्धा अधिकारी नाही त्यांच्याबरोबर अवैध दारूवर धाड टाकण्यासाठी पोलीस नाही// त्यामुळे तालुक्यात गावठी दारू लायसन नसलेले ढाबे अनेक पान टपऱ्यांवर डुबलीकेट दारू जोमात सुरू असून जळगाव दारूबंदी विभाग यांनी लक्ष द्यावे अशी चर्चा नागरिकात होत आहे// दारूबंदी नाव देऊन काय फायदा// दारूबंदी काय तर म्हणे दारूबंदी विभाग











