जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील📢 जाहीर प्रकटन: तारखेडा खु: येथील शेतकरी राजेंद्र केशव पाटील यांच्या कायदेशीर लढ्याचा आणि सत्याचा विजय सत्य त्रासून जाईल पण पराभूत होणार नाही सर्व आम जनतेला व ग्रामस्थांना मौजे तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील गट नं. 172/2 च्या संदर्भातील संपूर्ण वस्तुस्थिती आणि झालेला कायदेशीर संघर्ष समजला पाहिजे यासाठी हे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करत आहोत

एका प्रामाणिक शेतकऱ्याला स्वतःच्या हक्काच्या जमिनीत शेती करण्यापासून रोखण्यासाठी राजकीय बळाचा आणि गुंडगिरीचा कसा वापर केला गेला आणि शेवटी कायद्याने त्यांना कसा धडा शिकवला याची ही सत्यकथा पार्श्वभूमी दोन हंगाम शेती पडीक ठेवण्याचे कारस्थान शेतकरी राजेंद्र केशव पाटील हे गट नं. १७२/२ चे कायदेशीर मालक आहेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेताच्या बांधावर झाड कोसळले होते तसेच इतर काही झाडांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते जेव्हा राजेंद्र पाटील झाडे काढण्यासाठी आणि मशागत करण्यासाठी गेले तेव्हा लगतच्या काही विघ्नसंतोषी आणि दांडगाई करणाऱ्या प्रवृत्तींनी त्यांना मारहाण केली शिवीगाळ केली आणि शेती कसण्यास बेकायदेशीर अडथळा निर्माण केला गावातील काही विशिष्ट अपप्रवृत्तींच्या राजकीय पाठबळामुळे या घटकांची हिंमत एवढी वाढली की त्यांनी राजेंद्र पाटील यांना दोन पूर्ण हंगाम स्वतःच्या शेतात पाय ठेवू दिला नाही संपूर्ण गावाने आणि समाजाने हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे सनदशीर लढा आणि विरोधकांचे खोटे डावपेच राजेंद्र पाटील यांनी कायद्याचा हात धरला त्यांनी मा. तहसीलदार साहेब आणि RFO (वन विभाग) यांच्याकडे रितसर अर्ज करून झाडे छाटण्याची परवानगी व पोलीस बंदोबस्ताची मागणी केली यावर सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगीचे आदेश पारित केले हे आदेश रद्द करण्यासाठी राजकीय दबावाचा गैरवापर करून विरोधकांनी बेकायदेशीरपणे स्थगिती आदेश (Stay Order) मिळवला हा वाद तब्बल वर्षभर न्यायालयात चालवून शेतकऱ्याला मानसिक आणि आर्थिक त्रासात टाकण्याचे काम केले गेले. परंतु विरोधकांचा खोटेपणा जास्त काळ टिकू शकला नाही मा. जिल्हाधिकारी व मा. प्रांत साहेबांचा ऐतिहासिक निर्णय वर्षभराच्या कायदेशीर लढ्यानंतर मा जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मा. प्रांत अधिकारी (SDO) साहेबांनी दिनांक 15/09/2026 रोजी अंतिम निकाल दिला. या निकालाद्वारे विरोधकांच्या दांडगाईला चपराक बसली न्यायालयाने स्पष्ट केले की राजेंद्र केशव पाटील यांच्या हक्काच्या शेतात कोणीही बेकायदेशीरपणे पाय ठेवणार नाही आणि अडथळा आणणार नाही पाचोरा तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात झाडे व फांद्या छाटण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले दिनांक 5 /11/2026 शासकीय यंत्रणेची सामूहिक अंमलबजावणी आणि विरोधकांची नामुष्की उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काल दिनांक 05/11/2026 रोजी पाचोरा-सारोळा रोडसमोरील गट क्र. 172/2 मध्ये खालील संपूर्ण शासकीय यंत्रणा तैनात होती मंडळ अधिकारी (गाळण बु.)तलाठी (तारखेडा खु.)
वनपाल (RFO प्रतिनिधी) ग्रामसेवक आप्पा प्रशासक मॅडम दोन पोलिस बंदोबस्तसाठी आलेले पोलिस पुरुष व स्री पोलीस हवदार अधिक मदतीसाठी बोलवलेला बंदोबस्त अंती पोलिस उपनिरीक्षक (PSI) व पोलीस फौजफाटा एवढी मोठी शासकीय यंत्रणा हजर असतानाही राजकीय अहंकाराने माजलेल्या त्या प्रवृत्तींनी सुरुवातीला प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा खोटे रडण्याचे सोंग घेण्याचा आणि धुडगूस घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आम्हाचा झाड छाटण्यास विरोध नाही असे कोर्टात सांगणारे प्रत्यक्षात मात्र यंत्रणेवर दबाव आणत होते परंतु खोट्या अफवांचा आणि स्थानिक राजकीय पडद्याचा पार चिंधड्या उडाल्या शासकीय यंत्रणेने कायद्याचे तंतोतंत पालन करत सर्व अडथळे दूर केले, झाडांची रितसर छाटणी केली आणि राजेंद्र पाटील यांच्या शेतीचा मार्ग कायमचा मोकळा केला निष्कर्श: हा तर अन्यायाविरुद्धचा इंकलाब पाचोरा-सारोळा रोडवरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आता स्पष्ट दिसेल की, एका बाजूला राजकीय उन्माद आणि गुंडगिरी होती तर दुसऱ्या बाजूला एका शेतकऱ्याचा कायद्यावरील अढळ विश्वास होता हा विजय सिद्ध करतो की भारतात आजही लोकशाही आणि कायदे व्यवस्था जिवंत आहे राजकीय दबाव आणून गरिबांना चिरडणाऱ्या प्रवृत्तींची या कारवाईमुळे संपूर्ण पंचक्रोशीत मोठी नामुष्की झाली आहे कायद्याचा विजय असो! झिंदाबाद सदरिल घटनेचे अनेक व्हिडिओ आहेत तरि स्टोरेज अभावी सोबत ठेवलेले आहेत इंकलाब झिंदाबाद!










