जिल्हा जळगाव भुसावळ तालुका पोलिसांची एम.डी. ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई; 4 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून भुसावळ तालुका पोलिसांनी एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली आहे. किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 62.21 ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त केली असून याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. या कारवाईत दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेटसह एकूण 7 लाख 28 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे भुसावल प्रतिनिधी गोपी अण्णा किन्ही एमआयडीसी परिसरात पहाटे छापा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किन्ही एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची विक्री व ताबा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या एकूण 62.21 ग्रॅम एम.डी. पावडरची किंमत 2 लाख 48 हजार 840 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे यापैकी 55.33 ग्रॅम एम.डी. असगरखान याच्याकडून हस्तगत करण्यात आली चार आरोपींना अटक या प्रकरणात पोलिसांनी खालील 4 आरोपींना अटक केली आहे.रिशभ कुणाल खेडकर (वय 18, रा. कंडारी, भुसावळ)प्रथमेश दिलीप आव्हाड (वय 27, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ)शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय 26, रा. नसरंजी फाईल, भुसावळ)असगरखान अनवरखान (वय 57, रा. अयान कॉलनी भुसावळ) दोन दुचाकी आणि चार मोबाईलही जप्त पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांसह दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत.एम.डी. पावडर: 62.21 ग्रॅम – 2,48,840 रुपये, मोटारसायकली: रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर – 3,25,000 रुपये, मोबाईल हँडसेट: आयफोन 16, आयफोन 13, टेक्नो व रेडमी – 1,55,000 रुपये. अशा प्रकारे एकूण 7 लाख 28 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा कठोर इशारा या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 226 /2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (क) 22 (क) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे अशा अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अंमली पदार्थमुक्त जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे











