ताज्या बातम्या

स्वर्गीय प्रणव बडगुजर यांच्या स्मरणार्थ पारोळा तालुक्यातील तरडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हीच मदत भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार


जिल्हा जळगाव पारोळा तालुक्यातील तरडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हीच मदत भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार किती पैसा कमवा पैशाचा व्यवस्थित मार्ग म्हणजे गोरगरीब गरजू विद्यार्थी यांना शिक्षणासाठी स्वतः जाऊन त्यांना वस्तू घेऊन देणे हेच जगात मोठ पुण्य अनेक शूरवीर दान करणारे लोक जिवंत आहेत म्हणून शिक्षणासाठीच देशाचा पैसा खर्च झालाच पाहिजे इतर कामात व्यर्थ असतो शिक्षण झाल्याशिवाय देशाचा विकास होत नाही शिक्षणामुळे देशाचे भवितव्य घडते पारोळा तालुक्यातील तरडी येथील स्वर्गीय प्रणव सुनील बडगुजर यांच्या स्मरणार्थ शाळेतील 80 विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल दप्तर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षिका देवयानी बडगुजर यांनी राबवला त्यांची पुतणे स्वर्गीय प्रणव बडगुजर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विनोद पवार तर प्रमुख पाहुणे गटशिक्षण विकास अधिकारी विश्वास हरी पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले शालेय विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे विजय जगन्नाथ बडगुजर मुख्याध्यापक डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय व देवयानी बडगुजर हे सामाजिक उपक्रम राबवत असतात पोषण आहार अधीक्षक सी एम चौधरी केंद्रप्रमुख निलेश पाटील शालेय व्यवस्थापक समिती सदस्य शिवाजी पवार विधीतज्ञ वेधव्रत काटे व इतर सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा रावतोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा पवार तर देवयानी बडगुजर यांनी आभार मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button