ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ येथील भुलाबाई महोत्सवातील सिद्धेश्वरनगर शाळेच्या विद्यार्थिनींचा गौरव


नगरसेविका शामलताई झांबरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक वरणगाव ता भुसावळ : येथे आयोजित तालुकास्तरीय भुलाबाई महोत्सव 2026 मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या जि.प. प्राथमिक मराठी शाळा सिद्धेश्वरनगर वरणगाव येथील विद्यार्थिनींचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला.वरणगाव नगर परिषदेच्या नगरसेविका तथा जिल्हा दुग्ध विकास संस्थेच्या संचालिका सौ. शामलताई अतुल झांबरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपालीताई हिवरे यांच्या उपस्थितीत सहभागी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थिनींना मिळून 1100 रुपयांचे रोख प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. शाळेलाही मानचिन्ह म्हणून ट्रॉफी प्रदान करण्यात आली.केशव स्मृती प्रतिष्ठान अंतर्गत ललित कला संवर्धिनी व प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ यांच्या माध्यमातून दरवर्षी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या उपक्रमाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि पारंपरिक कला-संस्कृतीची जपणूक करणे हा आहे.यावेळी मार्गदर्शन करताना शामलताई झांबरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शाळेचे तसेच वरणगाव परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर शोधलेले उपाय याबाबत श्रीमती भारतीताई अवचारे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल देशपांडे यांनी केले उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य के. एम. पाटील व कला शिक्षक प्रवीण इंगळे यांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती उज्वलाताई धांडे यांनी केले. यावेळी शाम हेरोळे, श्रीमती शारदाताई सुरवाडे, सौ.शुभांगीताई सपकाळ यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button