BREAKING NEWS महाराष्ट्र शासन महसूल विभाग (भूसंपादन सह) 72 समन्वय 03 शासन निर्णय क्र, बैठक 9 सप्टेंबर 2026 मंत्रालय मुंबई यांच्याद्वारे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार सर्व कार्यकालिन कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 ही वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी अनिवार्य आहे या अंतर्गत बैठका अथवा कॉन्फरन्स VC नियोजन करू नये शासनाचे आदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ आणि अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दर्शनी भागात ठळकपणे बोर्ड लावण्यात यावा

महाराष्ट्र शासनाने महसूल विभागासाठी भूसंपादन सह शासन निर्णय परिपत्रक जारी केले आहे शासन परिपत्रक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांना आजपासून स्वतःच्या कार्यालयात दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत नागरिकांच्या प्रशासकीय अडीअडचणी साठी थांबावेच लागेल राज्य शासनाचा आज शासन निर्णय निर्गमित शासन परिपत्रक राज्य शासनाच्या विभागामार्फत अनेक धोरणात्मक नियम घेतले जात आहे सदर हे धोरणात्मक नियम राबवण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपवण्यात आली असून त्यामुळे तालुका जिल्हा अशा स्तरावर राज्य शासनाची कार्यालये कार्यरत असून या कार्यालयाशी सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येत असतो जनतेच्या तक्रारी समजून घेणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे शासनाच्या विविध योजना इ, माहिती देणे इ, कामे स्थानिक कार्यालयातील अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे त्यामुळे जनसामान्य लोकाभिमुख शासनाची प्रतिमा तयार होते परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की जेव्हा लोक तक्रारी आपले गाराने अडचणी घेऊन स्थानिक कार्यालयात जातात तेव्हा अधिकारी/ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात जनतेच्या तक्रारीची दखल न घेतल्याने आणि त्यांचे समाधान न झाल्याने ही सर्व जनता त्यांच्या तक्रारी अडचणी घेऊन थेट मंत्रालयात जातात सबब लोकांच्या तक्रारीची दखल घेणे त्यांचे समाधान करण्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात याव्यात राखीव वेळ कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगतांसाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 ही वेळ सर्वसामान्य नागरिक भेटीसाठी आणि त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावी बैठकीचे नियोजन सदर राखीव वेळेत 3 ते 5 कोणत्याही अंतर्गत बैठका अथवा कन्फरन्सिंगचे (VC) नियोजन करू नये जेणेकरून नागरिकांना पूर्ण वेळ देता येईल सूचनाफलक या राखीव वेळेबाबत ची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा










