ताज्या बातम्या

विविध जाहीर प्रमुख मागण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण..गंगापूर तालुका प्रतिनिधी :-गंगापूर येथे,शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साखळी उपोषण



गंगापूर तालुका प्रतिनिधी :-
गंगापूर येथे,शबरी माता संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साखळी उपोषण दि. 08/09/2026 वेळ: सकाळी 11:00 वा. पासून मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिवाणी याचिका क्र. 10301/2025, मच्छिंद्र एकनाथ मोरे व ईतर वि. महाराष्ट्र शासन व ईतर या प्रकरणात दि. 13.10.2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुसंगाने गट नं. 29 (जुना सर्व्हे नं. 30), मौजे आंबेवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील गायरान जमिनीबाबत शासन निर्णय दि. 28.11.1991 नुसार न्यायालयीन आदेशाची, जलद गतीने अंमलबजावणी, त्वरित व्हावी, या मागणीसाठी, बेमुदत साखळी उपोषण.प्रमुख मागण्या
1) प्रधानमंत्री आवास योजने सर्वासाठी घरे 2022 अंतर्गत गट नं. 29 मधील बांधकामास स्थगिती देण्याबाबत मा. मुख्याधिकारी, नगर परिषद गंगापूर यांचेकडे कार्यवाही करावी.2)गट नं. 29 मधील पूर्ण 3 एकर क्षेत्र अतिक्रमणधारकांच्या त्वरित नावे करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. यावेळी उपस्थित
संस्थापक अध्यक्ष नेतृत्व दिपक दादा बर्डे शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य उपोषण करते,मच्छिंद्र एकनाथ मोरे कांताबाई कडूबाक़ दसपुते,कचरू हरी खुरसने जिल्हाध्यक्ष लखन मोरे, निरंजन गोरे जिल्हा सचिव गंगापूर तालुका अध्यक्ष साईनाथ राजपूत महाराष्ट्र राज्य सचिव शरद भाऊ पवार, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, नवनाथ आव्हाटे, जनार्दन दरेकर, शिवाजी सांबरे, व ईतर सर्व गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी गावातील, सर्व समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या, प्रमुख उपस्थितीत बेमुदत साखळी उपोषण तहसील कार्यालय गंगापूर येथे करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button