महसूल कसा बुडवायचा अत्यंत महत्वपूर्ण अर्थपूर्ण विषय RTO विभाग असो किंवा इतर ठिकाणी असो शासनाची फसवणूक शासनाचेच अधिकारी कशा प्रकारे करतात मोटार वाहन कराच्या महसुलाला लावला सुरुंग हजारो ओटी पेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज सुमारे 5,664 वाहनांची परराज्यात नोंदणी त्याच प्रकारे रेशनिंगचा गहू तांदूळ कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो तेही आपण पाहत आहे जनतेमध्ये कधी होणार जागृती भ्रष्टाचारी महसूलच्या मुस्क्या आवरणार यांच्या मागे कोणाचा आशीर्वाद?

महसूल विभाग अत्यंत भ्रष्टाचारी झाला असून या महसूल विभागाच्या मुस्क्या कोण आवरणार यांच्या मागे आशीर्वाद कोणाचा? जर आरटीओ विभागात हजारो कोटींपेक्षा जास्त महसूल बुडवण्याचा प्राथमिक अंदाज तर मजूर विभागात किती भ्रष्टाचार होतो याचा अंदाज आपण करू शकत नाही याचा अर्थ असा की जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो शेतकऱ्यांच्या शेतीमालावर किती नफा कमवतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे अनुदान सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी कशाप्रकारे गायब करतात महसूल विभागामध्ये म्हणजेच कलेक्टर ऑफिस पासून किती अधिकारी आतापर्यंत भ्रष्टाचारामध्ये सामील आहे त्यांच्या साध्या चौकशी सुद्धा होत नाही बाकीचे विषय विभाग सोडूनच द्या सध्या आरटीओ विभाग सुद्धा मागे राहिलेला नाही आरटीओ विभागात सुमारे 5,664 वाहनांची परराज्यात नोंदणी झाली. नोंदणी झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडाला मग राज्यकर्ते करता तरी काय? ज्यांना आम्ही निवडून दिले ते करतात तरी काय? मुंबई राज्यातील राजधानी असून सगळे मुख्य कार्यालय मंत्रालय मुंबई येथे असून मंत्रालयामध्ये पीए करतात काय? यांना फक्त वसुलीसाठी बसवले आहे का? जनतेचे कार्य करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला टेबलाखालून पैसे द्यावे लागतात लोकशाहीत अतिशय निंदनीय बाब असून अशा घटना का घडू देतात महाराष्ट्र राज्यातील वाहन वितरकाकडून आर्थिक वर्ष 2025/ 26 मध्ये विक्री झालेल्या 50 लाख रुपये व त्यापेक्षा अधिक किमतीच्या सुमारे 5664 वाहनांची परराज्यात नोंदणी करण्यात आली ही माहिती स्वतः परिवहन विभागाच्या निदर्शनात आली म्हणजेच याचा अर्थ पहिले सगळे घडू दिले आणि नंतर निदर्शनात आले आंधळ दळतं आणि टिंब टिंब पीठ खात महाराष्ट्र राज्यातील रस्त्यावर नियमितपणे चालणारे वाहने या वाहनांचा कर महाराष्ट्राच्या महसूल मध्ये जमा झालाच नाही याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला परराज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या वाहनांची नेमकी संख्या किती याची माहिती संकलित केली जात आहे आता झोपी गेलेले जागे झाले परराज्यात नोंदणी झालेल्या या वाहनांचा महाराष्ट्र राज्यातील 9 परिवहन कार्यालयातील तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र (सी आर टी इ एम) दिले आहे यामध्ये स्पोर्ट आणि लक्झरी कार फोर व्हीलर क्रेन ट्रक अशा वाहनांचा समावेश आहे यापैकी मोठ्या संख्येने वाहने आणि दादर नगर हवेली तसेच दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात नोंद झालेली आढळून आली मागच्या न्यूज मध्ये मी ही संपूर्ण माहिती टाकली होती नोंदणी झालेल्या वाहनांच्या पत्त्यात अनियमितता आढळून आली चौकशी केली असता त्यांच्या पत्त्याच्या पुराव्यात आणि कागदपत्रात सुद्धा अनियमितता आढळून आली त्याची सखोल चौकशी करून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहे तसेच त्या संबंधित 9 कार्यालयांवर (सी आर टी इ एम) केलेल्या वाहनांची कागदपत्रे नियुक्त करण्यात आलेल्या मोटर वाहन निरीक्षकांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेलेले आहे कमी कर लागू असल्यामुळे परराज्यात वाहनांची नोंदणी झाल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले क्रेन पोकलेन मशीन एक्सक्यावेटरच्या नोंदणी नुसार पूर्वी वजनानुसार कर भरावा लागायचा आता किमतीनुसार कर असल्याने नोंदणी गुजरात मध्ये होत आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आरटीओ निहाय (सी आर टी इ एम) प्रमाणपत्र वितरित ठाणे जिल्हा 1272 पिंपरी चिंचवड 1061 वडाळा 280 नवी मुंबई 617 पनवेल 571 नागपूर शहर व ग्रामीण 387 अंधेरी 754 पुणे 146 ताडदेव 131 किमान 3 हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडाला वरील 5664 वाहनांची परराज्यात नोंदणी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा यावर 3% टक्के प्रमाणे कर धरला तर 849:6 कोटी कर परराज्यात जमा झाला या कराचा भरणा महाराष्ट्र राज्यात झाला असता तर 2500 ते 3000 कोटी रुपये वसूल झाले असते आणि महाराष्ट्र शासनाला महसूल मिळाला असता त्यामुळे तात्पुरती नोंदणी घेतलेल्या संबंधित वाहने कोणत्या राज्यात वापरली गेली तसेच वाहन मालकाचा पत्ता आणि परराज्यातील नोंदणीची कारणे याची पडताळणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी 4 वरिष्ठ मोटर वाहन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे वरील सर्व वाहने वितरकांची पडताळणी करण्यासाठी संबंधित आरटीओ कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वितरकाकडून विक्री झालेल्या वाहनांची तसेच वाहन मालक यांच्या पत्त्यांची तपासणी होणार आहे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र देताना अर्जदाराने सादर केल्याचा त्यांच्या पत्त्याचा पुरावा केंद्रीय मोटर वाहन नियम क्रमांक 1989 मधील नियम 4 नुसार आहे किंवा नाही हे सुद्धा तपासले जाणार आहे ही कार्यवाही सक्षम होण्यासाठी वरील नेमलेल्या अधिकाऱ्यांनी आपले कार्य चोक बनवावे जनतेकडून मागणी होत आहे










