BREAKING NEWS रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी CRMS चा एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रलंबित मागण्या रेल्वे मजदूर संघआक्रमक

__
भुसावळ प्रतिनिधी : गोपी अण्णा (भुसावल) भारतीय रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (CRMS) आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणांविरोधात आवाज उठवत महाव्यवस्थापकांना सविस्तर मागणीपत्र सादर केले.या शिष्टमंडळात मंडळाध्यक्ष शेख मोहम्मद इरफान, मंडळ सचिव एस. बी. पाटील, मंडळ समन्वयक दीपक शर्मा, मंडळ कोषाध्यक्ष एस. के. दुबे, सहाय्यक सरचिटणीस डी. के. पटसारिया, मंडळ सचिव (कारखाना) किशोर कोलते, ऑर्गनायझर गणेश सिंग, कार्यकारी अध्यक्ष पुष्पेन्द्र कापडे, सहसचिव किरण बढे, मुख्यालय कार्यकारी अध्यक्षा अलका चौधरी, मंडळ महिला अध्यक्षा कल्पना भालेराव आणि महिला सचिव मंगला मोटे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.संघटनेने ट्रॅक मेंटेनर, सेफ्टी स्टाफ तसेच रनिंग स्टाफच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, त्यांच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला.लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट यांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यसोबतच रेल्वे सुरक्षेतेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा दबाव आणला जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे, रिक्त पदे तातडीने भरणे, रनिंग स्टाफला पुरेशी विश्रांती देणे, कर्मचाऱ्यांचे प्रमोशन आणि निवासस्थानांच्या समस्या सोडविणे या प्रमुख मागण्या संघटनेने प्रशासनासमोर मांडल्या आहेत.या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा CRMSने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष केवळ निवेदनापुरता_ मर्यादित न ठेवता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.









