जिल्हा जळगाव तालुका भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोर हाणामारी; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल शांततेचा भंग केल्याप्रकरणी

भुसावल प्रतिनिधी गोपी अण्णा
भुसावळ : शहर पोलीस ठाण्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आपापसात हुज्जत घालत शिवीगाळ व मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.याप्रकरणी पोलीस हवालदार सुनीता मधुकर लेले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सुशिल भगवान लोखंडे (वय 47), यश नितीन नहाले (18), रत्ना सुनिल लोखंडे (38), शिव भगवान लोखंडे (64), शौर्य सुनिल लोखंडे (16), राहुल सुदाम सपकाळे (36), किरण लक्ष्मण बोरसे (40), तेज किरण बोरसे (16) आणि योगीता किरण बोरसे, सर्व संबंधित भुसावळ परिसरातील रहिवासी, यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 169/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करीत होते. त्यानंतर त्यांच्यात वाद वाढून एकमेकांशी हुज्जत, शिवीगाळ आणि मारामारी झाली. या प्रकारामुळे परिसरातील शांतता भंग झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.घटनेची नोंद शनिवारी सायंकाळी 6.10 वाजता करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने करीत आहेत. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर सध्या परिस्थिती शांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे











