जिल्हा जळगाव तालुका भुसावळ सेंट अलाॅयशियस हायस्कूल, भुसावळ येथे दिं 15 ऑगस्ट ला स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.

भुसावल प्रतिनिधी गोपी अण्णा
सेंट अलाॅयशियस हाय स्कूल, भुसावळ येथे दिं 15 ऑगस्ट ला स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन जळगांव जिल्ह्या फुटबॉल असोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री आबिद यांना आमंत्रित करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांनी केले. यानिमित्त आयोजित सहविचार सभेत माजी विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव मा. शिला सायमन, कोशाध्यक्ष व टीम मधे ईतर माजी विद्यार्थी व माजी शिक्षक घेण्यात आले.त्याचबरोबर 2021 ते 2026 चे माझी विद्यार्थ्यांची फुटबॉल मॅच चे उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय श्री आबिद शेख यांनी फुटबॉल ला किक करून झाले आणि फुटबॉल खेळण्यास सुरुवात झाली.
अध्यक्षांनी माजी विद्यार्थी संघाची रूपरेषा, उद्दिष्टे व भावी कार्य याची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. शेवटी 2022 ची टिम स्पर्धा जिंकल्यावर विजेतेपद पटकाविले.उप विजेतेपद 2024 बॅच मधील खेळाडू ठरले व त्यांना सेंट अलाॅयशियस शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सिस्टर शीला सायमन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर विजेता टीम ला प्रमुख पाहुणे मा. आबिद शेख यांच्या हस्ते देण्यात आले.मेडल व सम्मान पत्र माजी विद्यार्थी संघाची अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिले. चहा नास्ता व खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.








