जळगाव महानगर _पालिकेतर्फे रस्ते दुरुस्ती मुळे दिलासा ! महापौर दीपमाला काळे यांचे निर्देश महापालिकेकडून प्रमुख शनिपेठसह प्रमुख मार्गांच्या डागडुजीला वेग

जळगाव शहर प्रतिनिधी शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतर, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरांतील भिलपुरा पोलीस चौकी ते ममुराबाद रोड दरम्यान तसेच प्रमुख मार्गांवर रस्त्यांच्या डागडुजीचे काम वेगाने सुरू केले आहे.शहर अभियंता योगेश बोरोले यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, शहरातील मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणच्या खड्ड्यांचे पॅचवर्क तातडीने पूर्ण केले जात आहे. शहरातील नागरिक आणि वाहनधारकांची खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापौर दीपमाला काळे यांनी तात्काळ रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश दिले होते.शहर अभियंता योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलीस चौकी ते ममुराबाद रस्त्यावरील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांचे समतलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रमुख मार्गांची डागडुजी झाल्यामुळे शहरातील अपघातांचा धोकाही टळणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे जळगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित मार्गांची दुरुस्तीही पूर्ण केली जाईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.











