ताज्या बातम्या

जि; जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव व चाळीसगाव या दोन्ही कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहत नाही आठवड्यातून एक ते दोन वेळेस येतात यांची ड्युटी कोणत्या ठिकाणी आहे ? जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्मा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुद्धा सांगितले की ज्या ऑफिसला चार्ज आहे त्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी हजर राहावे मग आदेशाचे उल्लंघन? भडगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हे रुजू झाले आहे


मागील काळात नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा इतर अनेक अधिकारी यांनी केलेले पराक्रम यांनी केलेला बेकायदेशीर कामकाज आणि यांच्या वर झालेल्या तक्रारी अर्जाची दखल आजपर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांनी घेतली नाही फक्त आश्वासन देऊन त्याच अधिकाऱ्यांना बढती देऊन किंवा त्यांच्या बदल्या करून प्रकरण शांत करणे अशा अनेक घडामोडी महाराष्ट्र परिवहन कार्यालयात घडल्या त्यांच्या त्या घडलेल्या घटनांवर पाणी सोडून दिले का? उलट त्यांची तात्काळ बदली आणि कोणाची बढती यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून बढतीसाठी चेक पोस्ट टाका त्यानंतर अचूक जिल्हे अचूक तालुके अशा निवडक ठिकाणी बदली करण्यासाठी टेबलाखालून पैसा दिला जातो भरपूर वेळेस न्यूज युट्युब बातमी त्यानंतर वर्तमानपत्रांना यांनी केलेल्या पराक्रमाच्या बातम्या समोर आल्या असूनही त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही सरकार पगार कशासाठी देते हा मुख्य मुद्दा यांना आशीर्वाद कोणाचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी अनेक प्रकारचे बेकायदेशीर कामकाज केली नंदुरबार जिल्ह्यातील चांदसोली घाटात वाहन क्रमांक 39 AD 2802 या मालवाहू वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोठा एक्सीडेंट होऊन एकूण 35 प्रवासी होते 8 निरपराध व्यक्तींचा मृत्यू झाला होता त्याच काळात नंदुरबार परिवहन विभागाचे अधिकारी उत्तम जाधव असताना त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले अनेक तक्रारी अर्ज करण्यात आले परंतु उत्तम जाधव यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यानंतर उत्तम जाधव यांना सेवेतून बंडतर्फ करा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे निवेदन जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश कौतिकराव ढेंगे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई एस टी एन एल इमारत नंबर 2 पाचवा मजला महात्मा गांधी रोड मुंबई पोर्ट मुंबई दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी तक्रार अर्ज दिला होता आजपर्यंत कोणतीही कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्यावर झाली नाही ना त्यांना बंडतर्फ केले नाही आणि कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नसून उलट त्यांची बदली करून त्यांना जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी येथे नेमणूक करण्यात आली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button