ताज्या बातम्या

मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या मंडळ 2 तर्फे गोसेवा, वृक्षारोपणासह शालेय बॅग वाटप महापौर दीपमाला काळे यांनी केले रक्तदान


जळगाव : उत्तर महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व आणि राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 17 मे) जळगाव शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष मंडळ क्रमांक 2 (संत झुलेलाल-बहिणाबाई मंडळ क्रमांक 2) च्या वतीने आयोजित या उपक्रमांना कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विशेष म्हणजे, याप्रसंगी महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः रक्तदान करून या सेवायज्ञात सहभाग नोंदवला. आ. राजुमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी विविध उपक्रमांना सुरुवात झाली. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता पूर्ण दिवस सेवाकार्याने साजरा करण्यात आला.गोसेवेने झाली सुरुवात सकाळी ठीक 8:30 वाजता शाहू नगरातील तपस्वी हनुमान मंदिर व गोशाळेत गोसेवा करून उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गोमातांचे पूजन करून त्यांना चारा व अन्न अर्पण करण्यात आले महा-रक्तदान शिबिर सकाळी 9:00 वाजता भाजप युवा मोर्चा, जी.एम. फाउंडेशन आणि भाजप कामगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जी.एम. फाउंडेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रक्तदान केले. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.सागर पार्क येथे वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सकाळी 10 वाजता शहरातल्या सागर पार्क परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी कार्यकर्त्यांनी केला बालनिरीक्षण गृहात शालेय बॅग वाटप सकाळी 10:30 वाजता बालनिरीक्षण व सुधारगृहातील (रिमांड होम) बालकांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.या सर्व उपक्रमांना शहरांमधील सर्व नगरसेवक, भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ना. गिरीश भाऊ महाजन यांना दीर्घायुष्य लाभो, या प्रार्थनेसह सर्वच ठिकाणी उत्साहात हे सेवाकार्य पार पडले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button