नागपूरचे RTO किरण बिडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग शासन निर्णय क्रमांक MVD/0126 प्रक्र 12 परी 04 मादाम कामा मार्ग मुंबई हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 4000032

प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर कार्यालय प्रमुख किरण बिडकर निलंबित नागपूर शहर येथे कार्यरत असताना दिनांक 12/9/2025 रोजी स्कूल व्यायाम क्रमांक 31 EM 0036 व स्कूल बस क्रमांक MH 31 PC 1913 यांच्यात अपघात झाला होता वाहन चालकाचा व शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता हे प्रकरण संपूर्ण नागपूर शहरात चर्चेत होतं कारण वरील वाहनांची वाहन वैध योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणी बिडकर यांना निलंबित करण्यात आले ही न्यूज सिटी 85 संपादक निलेश पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती अनेक बातम्यांमुळे किरण बिडकर यांना दिनांक 7 मे 2026 रोजी निलंबित करण्यात आले किरण बिडकर हे नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रमुख असल्याने कर्तव्यात कसूर निष्काळजीपणा केल्यामुळे प्रथमदर्शनी आढळून आले सदर बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचा भंग करणारी आहे ज्याअर्थी उत्तर अनियमितेच्या अनुषंगाने किरण बिडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 खाली शिस्तभंगा विषयक कार्यवाही करण्याचे योजले आहे ज्याअर्थी महाराष्ट्र नागरी सेवा (नियम व अपील) नियम 1979 च्या नियम 4(1) अ या अन्वये किरण बिडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर यांना या आदेशाच्या दिनांक 7/5 / 2026 पासून सेवेतून निलंबित करण्यात येत आहे त्यानंतर असेही आदेश देण्यात आले आहे की जोपर्यंत हे आदेश अमलात असतील तेवढ्या कालावधीत किरण बिडकर यांचे मुख्यालय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई हे राहील तसेच त्यांना परिवहन आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही हे आदेश अस्तित्वात राहतील त्या कालावधीत किरण बिडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा निलंबन बंडतर्फी व सेवेतून काढून टयांच्या काळातील प्रदाने नियम 1981 च्या नियम 68 अन्वये निर्वाहभता व त्यावरील इतर मते अनुज्ञय राहतील यापुढे असे आदेश काढण्यात आले आहे की किरण बिडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांनी निलंबन कालावधीमध्ये कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा कोणत्याही व्यापारात अथवा स्वतःला गुंतवू नये तसेच त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा निलंबन बंड तर्फे या सेवेतून काढून टयांच्या काळातील प्रदाने नियम 1981 च्या नियम 61 पोटनियम (4) अन्वये आवश्यक असलेले प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्यांना निर्वाहभता देऊ नये निलंबन कालावधीत त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा कोणताही व्यापार धंदा केला तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 16 चा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात ते पात्र राहतील वरील शासन निर्णय हा मंत्रालयातून राज्यपाल यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेला आहे











