ताज्या बातम्या

महापौर येती घरा पाणीपुरवठ्याच्या तक्रारीवर दीपमाला काळे यांनी स्वतः घेतला आढावा प्रभाग १३ मधील रायसोनी नगरात तक्रारीचे निवारण, पाणीपुरवठा सुरळीत


जळगाव : जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या रायसोनी नगर परिसरात माऊली नगर आणि जे. के. विद्यालय परिसरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी पाणीपुरवठा विभागाला तात्काळ कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतर बुधवारी (५ मे) या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.या अनुषंगाने बुधवारी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासह नगरसेविका सुरेखा तायडे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घृष्णेश्वर साळुंखे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी माऊली नगर व जे. के. शाळा परिसरात थेट नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधला. “पाणी नियमित मिळत आहे का? तसेच पाण्याचा दाब योग्य आहे का?” अशी विचारणा महापौरांनी नागरिकांना केली. यावर नागरिकांनी पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष महापौर आणि उपमहापौर आपल्या दारी येऊन समस्या जाणून घेत असल्याबद्दलही नागरिकांकडून आनंद व्यक्त केला गेला.या भेटीदरम्यान काही नागरिकांनी परिसरातील गटारी वेळेवर साफ होत नसल्याची तक्रार महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. यावर महापौर दीपमाला काळे यांनी कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे सांगितले. महापौरांच्या या तत्परतेमुळे आणि समस्येचे त्वरित निवारण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, लोकप्रतिनिधींच्या या भेटीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button