महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अँटी करप्शन ब्युरो विभागाची कार्यवाही 4 हजार रुपयाची लाज स्वीकारताना खाजगी इसम रंगेहात पकडण्यात आला असून त्याला अटक झाली आहे

चाळीसगाव तालुक्यात अँटी करप्शन ब्युरो विभागाची कार्यवाही 4 हजार रुपयाची लाज स्वीकारताना खाजगी इसम रंगेहात पकडण्यात आला असून त्याला अटक झाली आहे खरेदीखत व सूची क्रमांक 02 च्या प्रमाणित नकला देण्यासाठी लाच मागणाऱ्या खाजगी इसमास अँटी करप्शन ब्युरो धुळे यांनी सापळा रचून कार्यवाही केली सुनील शिवदास निकम वय वर्ष 45 ह मु आनंदवाडी धुळे मालेगाव रोड चाळीसगाव या इसमास 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून त्याला अटक केली आहे तक्रारदार हे पिलखोड येथील रहिवासी असून त्यांचा सर्वे नंबर 4/1 व 4/2 मधील प्लॉट क्रमांक 12 या बिनशेती प्लॉटच्या खरेदी खत व सूची 02 च्या प्रमाणित नकला मिळवण्यासाठी त्यांनी 30 एप्रिल रोजी चाळीसगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता त्यावेळेस हजर असलेल्या सुनील शिवदास निकम याने संबंधित कागदपत्राच्या नकला देण्यासाठी 9,000 ची मागणी केली यामधील त्यांनी 5 हजार रुपये रोकडा घेतले व उर्वरित 4 हजार रुपये नकला देण्याच्या वेळेस देईल असे तक्रारदार यांनी कबूल केले होते तक्रारदार यांना लाच न देण्याची इच्छा होती सरकारी फी जेवढी असेल तेवढी भरण्यास त्यांची तयारी होती परंतु अनेक वेळेस दुय्यम निबंधक यांच्याकडे जाऊनही त्यांची कामे होत नव्हती त्यांच्या लक्षात आले की पैसे घेतले शिवाय आपले काम होणार नाही त्यामुळे त्यांनी धुळे येथील अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क केला त्यानुसार एसीबी विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला सापळा कार्यवाही दरम्यान आरोपीने तक्रारदारास कागदपत्रांच्या नकला दिल्या आणि 4 हजार रुपये घेताना अँटी करप्शन ब्युरो चा पथकाने आरोपीला जागेवरच पकडले या कार्यवाहीदरम्यान आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 अ अंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला ही कार्यवाही पोलीस उपधीक्षक सचिन साळुंखे यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्यासोबत पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे मकरंद पाटील प्रवीण पाटील सागर शिर्के प्रितेश चौधरी चंद्रकांत सैंदाणे रेश्मा परदेशी सुधीर व जगदीश बडगुजर यांचा समावेश होता दरम्यान शासकीय कामासाठी कोणीही लाच देऊ नये कोणी लाच मागितल्यास अँटी करप्शन ब्युरो यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान एसीबी विभागाने केले आहे








