NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील कालच्या भूसंपादनाच्या न्यूज ची घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल जळगाव अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव दि. मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले महापौर दीपमाला काळे

जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









