जळगाव महानगरपालिकेमध्ये भूसंपादन जमिनीमध्ये घोटाळा चुकीचे व्हॅल्युएशन दाखवून अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आणि करोडो रुपयाचा जनतेला चुना जळगावचे आमदार मा; राजू मामा भोळे यांचा आरोप

जळगाव मध्ये सध्या भूखंड त्यानंतर भूसंपादन असे अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे पुढे येत आहे यामुळे जनतेच्या कमाईवर डाका टाकणारे ते अधिकारी कोण? याची उच्चस्तरीय चौकशी थेट मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार असे जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांनी सांगितले भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप मनपाच्या महासभेत टी डी आर देण्याचा प्रस्ताव पारित होऊन पैसा कोणत्या स्वरूपात घेतला गेला हा पैसा बँकेतून महानगरपालिकेच्या खात्यात जायला हवा होता पण तो पैसा परस्पर कसा आला? त्यामुळे जळगाव महानगरपालिका आणखी संकटामध्ये येणार असे आमदार राजू मामा भोळे यांनी आरोप केले आहे नगरपालिका आर्थिक संकटात असल्यावर रोकडा पैसे घेतल्यावर शंका निर्माण होत असून जळगाव मध्ये ही चर्चा सुरू आहे आमदार राजू मामा यांनी आरोप केल्यानंतर काही भूसंपादन प्रकरणे न्यायालयात असून या प्रकरणात न्याय मिळाला आणि न्याय न मिळालेले सर्व प्रकरणांचे अहवाल सार्वजनिक केले जातील असे सुद्धा आमदार यांनी सांगितले महानगरपालिकेने भूसंपादन कामांमध्ये अनियमित्तता दाखवून जनतेचा विश्वास उडवला शेतकऱ्यांना त्यांच्या गेलेल्या जमिनी त्याबद्दल मिळालेले पैशाबद्दल माझे काही एक म्हणणे नाही पण भूसंपादनात झालेला घोटाळा फर्जीवाडा आपत्ती जनक असून याची चौकशी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल जमीन अधिग्रहण करण्याच्या वेळेस त्या जमिनीचे रेट जाणीवपूर्वक वाढवले गेले जळगाव मधील सगळ्यात महाग जागेवरचे भाव दाखवून किमती वाढवून त्याचा गाला फरक कोणत्या अधिकाऱ्यांनी केला त्याअधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून रोकडा पैसे का घेतले गेले लेखी व्यवहार का झाले नाही यामुळे जनतेचे नुकसान होऊन जळगाव महानगरपालिकेवर कर्जाचा बोजा वाढणार त्यामुळे प्रशासनाची चुप्पी भूसंपादन झालेल्या जमिनीवर जो घोटाळा झाला त्याची चौकशी लागणार या कारणाने प्रशासनाची चुप्पी का आहे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे राजू मामा भोळे यांनी आरोप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेसमोर हे विषय मांडले पाहिजे होते भूसंपादन केलेल्या जमिनीवर भुगतान रोकडा पद्धतीने केल्यामुळे महानगरपालिका संशयाच्या भवऱ्यात











