वाळू माफियांना बसणार ‘डिजिटल’ लगाम! बांबरुड खुर्द येथे सि.सि.टि.व्हि व गेटचे लोकार्पण पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन; लोक सहभागातून अवैध वाहतुकीवर करडी नजर त्यात महत्वपूर्ण म्हणजे अनेक ठिकाणी ठेके झालेले आहेत त्या ठिकाणी ठेकेदार डुबलीकेट पावत्या देऊन रात्रंदिवस वाहतूक करीत आहे असे बरेच दिवसा पासून सुरू आहे प्रांत अधिकारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले परंतु आता ही बाब नाशिक आयुक्तालय येथे जाणार

नांद्रा (ता.पाचोरा) ता.21
तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीला कायमचा पायबंद घालण्यासाठी बांबरुड खुर्द प्र. पा. ग्रामस्थांनी आणि महसूल प्रशासनाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. गावातील मुख्य रस्त्यावर, महादेव मंदिराच्या वळणाजवळ CCTV कॅमेरे आणि सुरक्षा गेट उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण पाचोरा तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.२४ तास राहणार वॉच: गेल्या काही काळापासून या भागातून अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे गेट व सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत कळीची ठरणार आहे. यामुळे गावातील मुख्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनावर आता २४ तास नजर ठेवली जाणार असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करणे प्रशासनाला सोपे होणार आहे. लोकसहभागाचा आदर्श: हा प्रकल्प केवळ प्रशासकीय नसून, यात गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. श्री. दिलीप बाळकृष्ण पाटील, श्री. विनोद जगदीश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त आर्थिक आणि शारीरिक सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांनी या लोकसहभागाचे विशेष कौतुक केले.यांची लाभली उपस्थिती:या सोहळ्याप्रसंगी मंडळ अधिकारी श्री. सुधाकर पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्री. अजमलशा मकानदार, ग्रामसेवक सौ. मीना द्राक्षे, सरपंच सौ. लताबाई भोई, माजी सरपंच सर्वश्री काकासाहेब कृष्णराव पाटील, कोमलसिंग आनंदसिंग पाटील, सौ. मंदाकिनी निळकंठ पाटील, पोलीस पाटील श्री. निळकंठ भिला पाटील यांच्यासह बांबरुड खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभिनव उपक्रमामुळे गावात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार असून, वाळू चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.बांबरुड खुर्द(ता.पाचोरा) येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या गेट व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करताना मा. तहसीलदार श्री. विजय बनसोडे व उपस्थित मान्यवर.










