राजगडप्रमाणे व.सा.का. नवनिर्माण चा लढा अंतिम टप्यात; या आठवड्यात गोड बातमी किंवा 1 मे ला करो या मरो चा ऐतिहासिक लढा सामाजिक कार्यकर्ता नीलकंठ पाटील पाचोरा जिल्हा जळगाव

राजगडप्रमाणे व.सा.का. नवनिर्माण चा लढा अंतिम टप्यात; या आठवड्यात गोड बातमी किंवा 1 मे ला करो या मरो चा ऐतिहासिक लढा सन्माननीय ग्रुप सदस्य नमस्कार. आज अक्षय त्रुतीया. आपल्या हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. या निमित्ताने आपण सर्वांशी आपल्या २ वर्षांपासूनच्या व.सा.का. नवनिर्माणच्या विषयावरील अद्ययावत माहिती देण्याचे मी ठरविले होते.आपण सर्वांना माहिती आहे की आपण दि.१२ मार्च २०२६ ते ०२ एप्रिल २०२६ असे २२ दिवस आपल्या व.सा.का. नवनिर्माण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले; पण त्यात आपल्याला अपयश आले. परिणामी ०३ एप्रिल २०२६ पासून आपल्या व.सा.का.चे राजगडप्रमाणे नवनिर्माण व्हावे यासाठी मी आधी ग्रुपवर जाहीर केल्याप्रमाणे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू केलेत. त्यात काहींमध्ये अपयशही आलेत; परंतू योग्य मार्ग शोधणे माझे सतत सुरू होते.आता आपण २ प्रकारे आपला राजगडप्रमाणे व.सा.का. नवनिर्माण चा प्रश्न शासनाकडून थकहमीरुपी कर्ज घेवून सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत:-
१) शासनाशी चर्चा करून विषय सोडविणे(२० एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) आणि
२) १ मे २०२६(महाराष्ट्र दिन)ला व.सा.का.वर एक न भूतो न भविष्यती असे ऐतिहासिक आंदोलन उभारुन शासनाकडून विषय मार्गी लावणे.आता क्रमांक १ प्रमाणे आपला विषय गेल्या आठवड्यात शासनदरबारी नियोजित होता; पण महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या सार्वजणिक जयंती उत्सवानिमित्त या आठवड्यात ठरले आहे. यात आपल्या व.सा.का.चे राजगडप्रमाणे थकहमीरुपी कर्ज देवून नवनिर्माण चे शासनाने मान्य केल्यास आपले १ मे २०२६(महाराष्ट्र दिनाचे)ऐतिहासिक आंदोलन आपोआपच रद्द होईल; मात्र या आठवड्यात राजगडप्रमाणे व.सा.का. नवनिर्माण चा विषय मार्गी नाही लागल्यास आपल्याला नाईलाजाने १ मे २०२६(महाराष्ट्र दिन) चे ऐतिहासिक आंदोलन करुन शासनाकडून आपले राजगडप्रमाणे व.सा.का.नवनिर्माण चे काम हक्काने करून घ्यावे लागेल. माहितीसाठी. धन्यवाद.
निळकंठ प्रल्हाद पाटील
अध्यक्ष – युगपुरुष व.सा.का.नवनिर्माण समिती.
मो.8007235001.









