दोन्ही बी. जे. मार्केटचा लूक बदलण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये; सहायक आयुक्तांकडून पथकासह पाहणी महापौरांच्या बैठकीतील निर्देशानुसार प्रथम टप्प्यात साफसफाई पूर्ण, शुक्रवारीही होणार सफाई महापूर दीपमाला काळे

जळगाव: शहर महानगरपालिकेच्या वतीने बी. जे. मार्केटमधील समस्या मार्गी लावण्यासाठी आजपासून विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी बी. जे. मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतील निर्णयानुसार, आज 2 एप्रिल रोजी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली.महापौर व असोसिएशनच्या निर्देशानुसार, आज सकाळी 10:30 वाजता सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी आरोग्य अधीक्षकांसह नवीन बी. जे. मार्केटची सविस्तर पाहणी केली. याप्रसंगी मार्केटमध्ये तत्काळ साफसफाईसाठी कामगार तैनात करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम उद्याही सुरू राहणार असून मार्केटचा परिसर चकाचक करण्यावर भर दिला जाणार आहे.केवळ आरोग्यच नव्हे, तर मार्केटमधील इतर पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महापालिकेचे सर्व महत्त्वाचे विभाग सक्रिय झाले आहेत. पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्यासोबत बांधकाम विभाग अभियंता पुराणिक, पाणीपुरवठा प्रमुख शशिकांत भांडारकर, विद्युत विभाग अभियंता चौधरी, अतिक्रमण विभाग अधीक्षक संजय ठाकूर, आरोग्य विभाग मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि मुकेश पाटील उपस्थित होते प्रस्तावित कामांचा आराखडा तयार या भेटीदरम्यान प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्राशी संबंधित कामांची पाहणी केली. यामध्ये तुटलेले रस्ते पाणी पुरवठ्याच्या अडचणी बंद पडलेले पथदिवे आणि अतिक्रमणांचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पाहणीनंतर प्रत्यक्ष कामांना वेग दिला जाणार आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या मार्केट साफसफाई अभियान अंतर्गत ही मोहिम राबविण्यात येत असून महापौरांच्या तत्परतेमुळे बी. जे. मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, मार्केटचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.










