जळगाव महानगर पालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

जळगाव महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनजळगाव : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.शिवतीर्थावर माल्यार्पण कार्यक्रमाची सुरुवात शहरातील मुख्य शिवतीर्थ चौकात झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता.महानगरपालिका इमारतीत मुख्य कार्यक्रम शिवतीर्थावरील अभिवादनानंतर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेला महापौर दीपमाला काळे यांनी पुष्पहार अर्पण केला.या प्रसंगी जळगाव शहराचे महापौर दीपमाला काळे,
मनोज चौधरी (उपमहापौर) ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त) डॉ. चंद्रशेखर पाटील (स्थायी समिती सभापती) शोभा बाविस्कर (अतिरिक्त आयुक्त) यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते








