ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता पाचोरा पंचायत समितीतील जन्म-मृत्यू नोंद रेकॉर्डमध्ये परत परत खाडाखोड; ही गंभीर बाब परत निदर्शनात आलेली आहे खाडाखोड करतो तरी कोण? दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे पहान


प्रतिनिधी : पाचोरा पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंद रेकॉर्डमध्ये खाडाखोड झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे याबाबत संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार लवकरच दाखल करणार आहे आतापर्यंत किती ठिकाणी खाडाखोड केली आहे यांची चौकशी करावी असे एकनाथ अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या कामकाजासाठी त्यांच्या स्वतःच्या मुलाची जन्म नोंद दाखल्याची आवश्यकता असल्याने त्यांनी दि. 19/ 6 /2025 रोजी पंचायत समिती पाचोरा येथे नक्कल मिळण्यासाठी अर्ज केला होता. तसेच त्यानंतर यांना जन्म दाखला मिळाला मात्र आजतागायत संबंधित जन्म दाखला मिळाला त्यानंतर ग्राम पंचायत समितीने जन्मतारीख वेगळ्याच तारखेची दिली आपली चूक लक्षात आल्यानंतर पाचोरा येथील दप्तरांमध्ये खाडाखोड झालेली स्पष्ट दिसत आहे.दरम्यान पंचायत समितीकडून देण्यात आलेल्या लेखी पत्रानुसार, मूळ जन्म नोंद रेकॉर्डवर तारखे मध्ये खाडाखोड झाल्याचे निदर्शनात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मूळ अभिलेखात खाडाखोड झाल्याचा संशय निर्माण होत असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे एकनाथ अहिरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या संदर्भात त्यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू नोंदींमध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती केवळ सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने आणि नियमानुसारच होणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित रेकॉर्डमध्ये खाडाखोड झाल्याचे आढळत असल्याने त्या प्रकरणी संबंधित तत्कालीन अभिलेख कक्ष अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यापूर्वी तारखेडा या संदर्भात गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे तक्रार करण्यात असल्याचे समजते त्यानुसार पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात यावे अहवाल अपूर्ण व त्रोटक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ अंतर्गत सरकारी रेकॉर्डमध्ये तसेच रेकॉर्डमध्ये फेरफार करणे हे बनावटगिरीच्या स्वरूपाचे असल्याने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३५, ३३८, ३४० तसेच जुने भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४६५, ४६८ व ४७१ अन्वये संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणीही तक्रारीत करण्यात येणार आहे दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचे एकनाथ अहिरे यांनी तक्रार अर्जाद्वारे सांगितले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button