ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील लाडकूबाई विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सिमा सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती


जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथील लाडकूबाई विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सिमा सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील ‘किसान’ शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या आदेशानुसार डॉ. सिमा भास्कर सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर संस्थेचे सचिव आदरणीय प्रशांत दादा, संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय डॉ. पूनम ताई संपूर्ण संचालक मंडळ तसेच किसान परिवारातील सर्व हितचिंतकांनी डॉ. सैंदाणे यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी डॉ. सिमा सैंदाणे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की,“माझी उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव आदरणीय प्रशांत दादा, संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय डॉ. पूनम ताई, संपूर्ण संचालक मंडळ व किसान परिवारातील सर्व हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांच्या सहकार्याने संस्थेने विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याची क्षमता माझ्यात यावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते व आपणा सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते.”डॉ. सैंदाणे यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासनिक कार्याला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नवे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास शिक्षक व पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे उपप्राचार्यपदी नियुक्त झाल्यानंतर डॉ. सिमा भास्कर सैंदाणे यांचा शुभेच्छांचा स्वीकार करताना क्षण.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button