ताज्या बातम्या

जळगाव शहर महानगरपालिका एकेरी प्लास्टिक वापरा संदर्भात जळगाव मा: महापौर यांचे कार्यालयात बैठक संपन्न दिनांक 1 मार्च 2026 पासून एकेरी प्लास्टिक बंद करणेबाबत कठोर कार्यवाही करण्यात येणार प्लास्टिक विक्री करताना आढळल्यास 25 हजार रुपये दंड महापौर मा: दीपमाला काळे


जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकेरी प्लास्टिक वापर जास्त होत असल्याने या प्लास्टिकमुळे प्रदूषण आणि जनावरे मरण्याचे प्रमाण वाढले असून एकेरी प्लॅस्टिक बंद करण्याचा निर्णय जळगाव महानगरपालिकेने घेतला आहे त्याची अंमलबजावणी दिनांक 1 मार्च 2026 पासून सुरुवात होणार प्लास्टिक विक्री वापराबाबत कठोर धोरण महानगरपालिका अवलंबणार आहे बंदी असलेले एकेरी प्लास्टिक बॅग विक्री आढळल्यास रुपये 25 हजार पर्यंत दंड आकारण्यात येणार असून सदर दंड न भरल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार कंपोस्टेबल पर्यावरण पूरक बॅग वापरण्यास अनिवार्य असून याबाबत कार्यवाही करणेबाबत देखील महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे दिनांक 16/2/2026 रोजी व्यापारी बांधवांची बैठक संपन्न झाली महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून उपमहापौर मनोज चौधरी मनपा सहआयुक्त (आरोग्य विभाग) सर्व आरोग्य अधिकारी प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य जैन उद्योग समूहाचे अधिकारी माझे शहर माझी जबाबदारी पर्यावरण प्रेमी व व्यापारी यांची उपस्थिती होती अनेक उपस्थित असलेले निसर्गप्रेमी यांनी दबक्या आवाजात सांगितले की प्लास्टिक तयार करण्याचे कारखाने बंद करण्यात यावे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button