ताज्या बातम्या

नोंदणी आरटीओ चेक पोस्ट लाच घेताना मोटार वाहन निरीक्षकका सह दोघे जेरबंद आता रोजच भ्रष्टाचाराची न्यूज मिळत असून आता ही काही नवीन गोष्ट राहिली नाही रोज काही ना काही प्रकरण घडत आहे सरकारचे उद्दिष्ट फक्त निवडणुका आणि फक्त निवडणुका विकास म्हणजेच भ्रष्टाचार का? आरटीओ ला महिन्याचा पगार 80 ते 90 हजार रुपये असतो गरिब शेतकरी सुशिक्षित बेरोजगार यांनी काय करावे? यांना विचारलं तर म्हणतात आम्हाला वर पैसे द्यावे लागतात नेमकी भानगड काय?


महाराष्ट्र सोलापूर नांदणी चेक पोस्टवर ट्रकचा ट्रेलर पास करण्यासाठी 2500 रुपयाची लाच घेत असताना आरटीओ अधिकाऱ्या सह त्याच्या पंटरला जालना येथील लाच लुचपत विभागाने अटक केली महिन्याला जवळपास 80 ते 90 हजार रुपये आरटीओ अधिकारींना पगार असतो मोटर वाहन निरीक्षक आरटीओ तानाजी शिवाजी धुमाळ वय 50 वर्षे राहणार पुणे व त्यांचा पंटर अमोल आप्पा पाटील वय वर्ष 52 राहणार सोलापूर यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले तक्रारदार हे मालवाहतूक चालक आहेत ते त्यांच्या रोजच्या जीवनात संघर्ष करीत कसंतरी आपला संसार चालवत आहेत ते नेहमी गुजरात मार्गे चेन्नई बायपास सोलापूर जात असतात या मार्गावर महाराष्ट्र कर्नाटक बॉण्ड्री वर दक्षिण सोलापूरकडील नांदणी या चेक पोस्ट वरून आपले वाहन पास करत असताना प्रत्येक वेळेस पैशाची मागणी होत होती त्यामुळे ते अक्षरशः कंटाळले होते शेवटी नाईलाजाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार केली सापळा रचून 12 डिसेंबर 2025 रोजी मेहसाणा येथून आपल्या ट्रेलर मध्ये म** भरून आनंदपुर येथे जाणार होते नांदणी येथील चेक पोस्टवरील मोटार वाहन निरीक्षक आरटीओ नेहमी पैसे मागण्याची शक्यता आहे त्यांना प्रत्येक वेळेस पैसे देण्याची माझी इच्छा नाही अशा आशयाची तक्रार जालना येथील लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्यानंतर लागलीच या पथकाने या तक्रारीची गंभीर दखल लाख लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी घेतली तक्रारदार हे स्वतः पंचा सोबत मोटर वाहन निरीक्षक नांदणी चेक पोस्ट सोलापूर यांच्या कक्षात गाडी पास करण्यासाठी परमिट घेऊन गेले असता त्यांच्या शेजारी बसलेला त्यांचा पटर याने मोटर वाहन निरीक्षक आरटीओ धुमाळ यांच्या समक्ष 3000 रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर 2500 रुपये स्वीकारण्याची मागणी मान्य झाली आरटीओ यांनी आपली मुखसंमती दाखवली आणि तक्रारदाराकडून 2500 रुपयाची लाख टेबलाखालून स्वीकारली आणि ते पैसे त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले लागली लाज लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले या झटापटीत आरटीओ निरीक्षक यांच्याकडून एप्पल चा मोबाईल स्मार्ट वॉच ब्लूटूथ तर पंटर याच्याकडून 12 हजार रुपयांच्या दोन अंगठ्या एक सोन्याची चैन व टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले 2500 हजार रुपये आणखीन 24 हजार 390 रुपये मिळाले त्याचप्रमाणे आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे कार्य रात्रीपर्यंत सुरू होते याप्रकरणी मद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कार्यवाहीत जालना येथील लाज लुजपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक बाळू जाधव तर पोलीस अंमलदार भालचंद्र बीनोरकर गणेश चेके अमोल चेके संदिपान लहाने शिवलिंग खुळे मनोहर भुतेकर गजानन कांबळे यांचा सहभाग होता लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले हे पुढील तपास करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button