ताज्या बातम्या

लोहारा येथे जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा



लोहारा तालुका पाचोरा एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक दिव्यांग (अपंग) दिन दरवर्षी दिनांक 3 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगांसाठी दिव्यांगांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून माणिक सोनार इरफान शेख अकबर व रणजीत राजपूत यांचा कर्तबगार दिव्यांग कार्यकर्ते म्हणून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दत्तात्रय भुसांडे गुरुजी होते ग्रामपंचायत उपसरपंच दीपक खरे भाजपा कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य कैलास आप्पा चौधरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी गुरुजी प्रथमेश मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सुर्वे माळी समाजाचे अध्यक्ष श्रीकृष्ण भिवसने डॉक्टर सुभाष घोंगडे संजय पाटील सुभाष बाविस्कर महेंद्र शेळके पत्रकार संघाचे कृष्णा आप्पा शेळके दीपक पवार रमेश आप्पा शेळके चंद्रकांत पाटील दिलीप चौधरी अनिल तडवी गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते यावेळी कैलास आप्पा चौधरी यांनी जागतिक दिव्यांग दिना चे महत्व विशद करून सांगितले तसेच दिव्यांना कशाप्रकारे सरकार न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे हे पत्रकार दीपक पवार यांनी सांगितले यावेळी सभेचे अध्यक्ष दत्तात्रय भुसांडे गुरुजी उपसरपंच दीपक खरे प्रभाकर चौधरी गुरुजी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले सदर कार्यक्रमास एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव विजय जाधव खजिनदार कांतीलाल राजपूत सदस्य विकास शिवदे भोई अनिल चौधरी न्हावी बाळू जाधव अनिल राजपूत अहमद खान पठाण प्रवीण शेळके व गावातील व परिसरातील दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button