ताज्या बातम्या

ACB अँटी करप्शन ब्युरो तेलंगाना 30 लाखाची लाच मागणाऱ्या महिला तहसीलदार आणि उपनिबंधक यांच्या घरी सापडले कोट्यावधीचे सोने चांदी हिऱ्यांचे दागिने शेती फ्लॅट्स या दोघांविरुद्ध त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून निलंबनही झाले


एसीबीच्या रेड मध्ये कोट्यावधीची संपत्ती जमा एसीबीच्या तपास दरम्यान तेलंगणा राज्यातील सिद्धी पेठ जिल्ह्यातील दामराकंटा गावात तहसीलदार आणि संयुक्त उपनिबंधक धुम्मा कोम्मा सुचरिता यांच्याविरुद्ध त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या श्रोता पेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तपासानुसार त्यांनी आपल्या सेवाकाळात भ्रष्ट आणि संशयास्पद मार्गांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानासह त्यांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांची संबंधित दोन-तीन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले कोट्यावधीची संपत्ती बेहिशोबी मालमत्ता रोख रक्कम सोने चांदी आणि हिऱ्यांचे दागिने आलिशान फ्लॅट्स भूखंड आणि कृषी साधन शेती अशी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली हे पाहून तपास अधिकारी यांना सुद्धा चक्कर येईल एवढी संपत्ती या संपत्तीची किंमत वाढण्याची शक्यता होत आहे एसीबीच्या तपास दरम्यान सिद्धी पेठ जिल्ह्यातील दामराकंटा गावात 2 एकर 17 गुंठे जमीन हैदराबाद येथील तीन मोठे मोठे फ्लॅट्स तसेच अनेक ठिकाणी भूखंड प्लॉटिंग 12 लाखापेक्षा जास्त रोकड फोर व्हीलर 2 कोटी रुपयांपर्यंतचे सोने हिऱ्यांचे दागिने 38 लाखाचे बँक बॅलेन्स शिल्लक ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे एसीबीच्या तपासा दरम्यान अधिकाऱ्यांना सिद्धी पेठ जिल्ह्यातील दामराकंठ गावात एसीबीच्या पथकाच्या माहितीनुसार आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेचे 5.05 कोटी पेक्षा अधिक आहे स्थावर मालमत्तेचे प्रत्यक्ष बाजार मूल्य अधिकृत कागदपत्रापेक्षा नमूद केलेल्या मूल्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे तपास दरम्यान आणखी 12 एकर शेतजमिनीची संबंधित कागदपत्रे ही सापडलेले आहेत या जमिनीचे अंदाजे बाजार मूल्य 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आता अतिरिक्त मालमत्तेचा शोध आणि पडताळणीचे काम अद्याप सुरू असल्याचे एसीबी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे तहसीलदार धुम्माकोम्मा सुचरीता यांना यापूर्वी म्हणजेच 26 मे रोजी एका स्वतंत्र लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आता सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहे 24 जून रोजी सरकारने निलंबित केले होते पुढील तपास सुरू असून लवकरच सगळ्या गोष्टींची शहानिशा होईल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button