जळगाव शहराला मिनी बायपासची भेटशिरसोली रस्ता ते एमआयडीसी संभाजीनगर महामार्ग जोडणाऱ्या १०० फुटी रस्त्याच्या विकासाला मिळणार गती महापौर दीपमाला काळे यांचा “ड्रीम प्रोजेक्ट”

ड्रीम प्रोजेक्टसाठी घेतली शेतकऱ्यांची बैठक जळगाव शिरसोली रस्ता ते एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 100 फुटी रस्त्याच्या विकासाबाबत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत मंगळवार, दिनांक 9 रोजी संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून विकासकामाला गती देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.या बैठकीला महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक श्री अरविंद देशमुख, नगररचनाकार अमोल पाटील आणि शहर अभियंता आर. टी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.जळगाव शहराच्या विकासासाठी १०० फुटी रस्ता ठरणार ‘वरदान’बैठकीदरम्यान महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थित जमीन मालकांना व शेतकऱ्यांना या संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसीकडून या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होईल, जो जळगाव शहरासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे,” व इच्छादेवी व अजिंठा चौफुलीतील वाहतूक कोंडी कमी होईल. असा विश्वास महापौरांनी या वेळी व्यक्त केला. या रस्त्यामुळे जळगाव शहराच्या वाढीला आणि विस्ताराला मोठी मदत होणार आहे.सदर रस्ता विशेष नियोजनांतर्गत विकसित केलाजणार असून त्यात मुख्य रस्ता, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, दुतर्फा वृक्षारोपण व लॅण्डस्केप असा आगळा वेगळा शहराची दर्जोन्नती करणारा प्रकल्प महापौरांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून साकारला जाणार आहे.जमीन मालकांना मिळणार टी.डी.आर.जळगावच्या मूळ डी.पी. (विकास नियंत्रण) रिपोर्टमध्ये संबंधित रस्त्यासाठीची जमीन विनामूल्य घेण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व संबंधित जमीन मालकांना जमिनीच्या बदल्यात ‘टी.डी.आर.’ देण्यात येणार आहे. व सर्व जमीनमलकांनी टी.डी.आर. घेऊन जमीन ताब्यात देण्यास सहमती दिल्याने महापौरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले नियमानुसार जमीन मालकांना तात्काळ टी.डी.आर. देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर आयुक्तांना आवश्यक ते आदेश देण्यात आले आहेत. जमीन मालकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अत्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल. “ही टी.डी.आर.ची प्रक्रिया पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांना त्यांचे टी.डी.आर. प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही महापौरांनी या वेळी दिली. शहराच्या आणि स्वतःच्या हितासाठी सर्व जमीन मालकांनी आवश्यक त्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून सहकार्य करावे, जेणेकरून हा रस्ता लवकर पूर्ण होऊन संपूर्ण परिसराचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा शेवटी महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केली.

















