ताज्या बातम्या

दि.07/6/2026 जिल्हा जळगाव तालुका पाचोरा पोलीसांची दमदार कामगीरी बाहेरील राज्यातील दोन वर्षापासुन फरार आरोपीस केले जेरबंद


आज दिनाक 7/6/2026 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे साहेब अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहोम साहेब यांच्या आदेशान्वये सरणा पोलीस स्टेशन जिल्हा अजमेर राज्य राजस्थान येथील दोन कोटीचे अफीन मादक पदार्थ संदर्भात दाखल गुन्हा रजि.नं. 11/2024 एन.डी.पी.एस अँक्ट कलम 8,15 भा.द.वी.क.201 गुन्ह्यांमधील दोन वर्षापासुन फरार आरोपी नामे गोविंद शंभु नाथ वय 27 बनका खेडा तालुका कोठली जिल्हा भिलवाडा राज्य राजस्थान हा पाचोरा शहरात असल्याची गुप्त माहीती श्री राहुलकुमार पवार पोलीस निरीक्षक पाचोरा यांना मिळाल्यावरुन पो.उप निरी. योगेश गणगे, सफौ, विलास पाटील पोकॉ योगेश पाटील, पोकों/गणेश कुवर यांना दिलेल्या सुचना प्रमाणे त्यानी वरील गुन्ह्यांतील आरोपीचा मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार शिफातीने तपास करुन आरोपी हा पळुन जाण्याच्या बेतात असतांना त्यास ताब्यात घेवुन राजस्थान पोलीसांच्या स्वाधिन केले असुन सदर आरोपीवर राजस्थान मधील अजमेर तसेच चित्तोगड पोलीस स्टेशन ला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. पाचोरा पोलीसांच्या सर्तकते मुळे परराज्यातील गंभीर गुन्हे करुन फरार असलेल्या आरोपीला जेरबंद केल्याने राजस्थान पोलीस दलाने व पाचोरा परीसरातील जनतेने पोलीस दलाचे मुक्तकंठाने कौतुक करुन कर्तव्यनिष्ठ पोलीसांचे आभार मानले आहे. पोलीसांनी दाखविलेली समयसूचकता यामुळे बाहेरील राज्यातील गुन्हेगार यांना गुन्हे करण्यास रोखले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button