ताज्या बातम्या

पत्रकार निलेश एस पाटील, सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे, पत्रकार चंदू खरे व पत्रकार कुंदन बेलदार यांच्या आमरण उपोषणाचा प्रभाव; पिंपळगाव परिसरातील अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाची हालचाल सुरू तब्बल 14 एप्रिल 2026 पासून ते आज दिनांक 14 मे 2026 रोजी पर्यंत सट्टा पत्ता मटका जुगार अवैध दारू विमल गुटखा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत विनापरवाना धंदे बंद आहे हा झाला आमरण उपोषणाचा प्रभाव// कोणी काहीही बोलले तरी समोर जे दिसतं ते सत्य आहे जनतेच्या चर्चेवरून हे सिद्ध झाले त्यानंतर तालुक्यात जिल्ह्यात मा; सुप्रिडेंटेड पोलीस (SP)जळगाव यांनी मोठमोठ्या बुगीनवर छापे मारले त्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या सट्टा मटका किंग बुगीचा अक्षरशा थरकाप उडाल्यामुळे त्यांच्या झोपा उडाल्या


जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी केलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याची चर्चा तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू झाली आहे.दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सुरू करण्यात आलेल्या या आमरण उपोषणात अवैध दारू विक्री, सट्टा-मटका, पत्त्यांचे क्लब, गावठी हातभट्टी, गुटखा-विमल विक्री तसेच विनापरवाना सुरू असलेल्या धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष व पत्रकारांची बदनामी केल्याचा आरोप करत सक्षम व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली होती.दरम्यान, उपोषणानंतर प्रशासन व पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत असून काही ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन मटका अड्ड्यावरच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.स्थानिक नागरिकांकडूनही या जनजागृती मोहिमेचे स्वागत केले जात असून, “फक्त कारवाईचे दिखावे नकोत; कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे उपोषणकर्त्यांनी सांगितले की, “ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गाव व तरुण पिढीला अवैध व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी आहे.”या आमरण उपोषणाच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून आगामी काळात आणखी कठोर कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button