ताज्या बातम्या

भारत शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी स्थान देऊन विकासाचा संकल्प होऊ शकतो पण केव्हा? हा राष्ट्रीय कार्यक्रम असावा लागतो जो खरा खानदानी पिढ्यानपिढ्या शेती करणारा शेतकरी असला पाहिजे राष्ट्रीय किसान मोर्चा संपूर्ण भारतात एकाच दिवशी एकाच वेळेस शेतकऱ्यां साठी आमरण उपोषण असो 1 दिवसीय आंदोलन असो किंवा रास्ता रोको असो ही संकल्पना घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आमदार खासदार झाले पर्याय एकच राष्ट्रीय किसान मोर्चामुळे आनंदगिर फार्मा प्रोड्युसर कंपनीला मान्यता किसान मोर्चाची मागणी मान्य


राष्ट्रीय किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा (मदर बामसेफ) आजपर्यंत 65 वर्षापासून कार्यरत असून संपूर्ण देशात राष्ट्रीय किसान मोर्चाचे जाळे हळूहळू पसरत आहे आणि त्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सगळ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी दिनांक एक डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेड कडे आनंदगीर फार्मा प्रोडूसर कंपनीला या शासकीय हमीभाव केंद्र म्हणून मान्यता देण्यासाठी नाफेड मुंबईकडे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या निवेदनानंतर परवानगी मागितली आणि ती मिळाली आनंदगीर फार्मा प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन दिनांक 28 डिसेंबर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी आमदार केराम म्हणाले शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी बांधिलकी जपत विकासाचे उपक्रम राबवण्याची हेच आमचे ध्येय आहे भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ योग्य बाजारभाव हमीभाव आणि फसवणुकीतून संरक्षण मिळावे यासाठी अशा फार्मर प्रोड्यूसर कंपन्या उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदेव केशव हे होते तर यावेळी जिल्हा परिषदेचे मा उपाध्यक्ष समाधान जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते प्राध्यापक राजेंद्र केशवे भाजप शहराध्यक्ष गोपू महामुने डॉक्टर निरंजन केशवे हाजी उस्मान खान मारुती रेकुलवार किशोर जगत फिरोज पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती आमदार केराम यांनी सांगितले की संपूर्ण विदर्भात लवकरच अशा कंपन्या सुरू केल्या जातील लांजी येथेही आम्ही कंपनी लवकरच सुरू करणार आहोत शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाफेडद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल हमीभाव खरेदी होऊ शकतो परंतु नाफेड मुळे काही ठिकाणी दुरावस्था झालेली असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी फार्मा प्रोड्यूसर कंपन्या ची सुरुवात झाली पाहिजे अशी प्रतिपादन त्यांनी केले यानंतर फार्म प्रोडूसर कंपनीचे मालक थीउरकर आमदार केराम यांनी विशेष कौतुक करून आभार मानले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या हा विजय राष्ट्रीय किसान मोर्चा चा असून सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 34;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button