गुन्हे

पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 23/ 11 2024 रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल एकूण आरोपी 24


पाचोरा येथे विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीचा निकाल दिनांक 20 /11/ 2024 रोजी लागला त्यात विजयी आमदार किशोर पाटील यांची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने मानसिंग कॉर्नर शिवाजीनगर येथून जात असताना त्यावेळी शिवाजीनगर येथील पाच ते सहा महिला गप्पा मारीत असताना आमदार किशोर पाटील यांची विजयी मिरवणूक डीजेच्या कर्कश आवाजात सुरू होती आणि हेतू पुरस्कार थांबून गाणे कोणते होते ते पहा बाप बाप तो बाप रहेगा हे गाणे सुरू होते त्या कर्कश आवाजामुळे त्या महिलांनी पुढे जाण्यास सांगितले त्याचा राग येऊन तीन-चार लोकांनी उभ्या असलेल्या तीन ते चार महिलांचे अंगावरील कपडे ओढून वेगवेगळे हावभाव करून नाचत होते अशी तक्रार यांनी माहिती दिली त्यावेळी त्या महिलांनी प्रवीण ब्राह्मणे याला सांगितले तुमच्या नाचणाऱ्या मधून महिलांना लाज वाटेल असे हावभाव करीत आहे लज्जा वाटेल असे आमच्या हातांना धरून डीजेच्या गाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला आमची साडी ओढून आम्हाला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लज्जा उत्पन्न होईल असे वागले त्यांनी आमचे कोणीही काही एक ऐकले नाही आता आमदार आमचा आहे पुढील पाच वर्ष आमचे आहेत असे म्हणून सदर डीजे समोर नाचणारे मुलांनी आमच्याकडे पाहून पुन्हा जोरजोरात नाचून अश्लील हावभाव करून पुढे निघून गेले वरील एक ते 24 आरोपीविरुद्ध कायदेशीर तक्रार असून एन सी आर 74,76,189, (2),191(1),191( 2) ,190,352 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पुढील तपास पीएसआय दळवी सो करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button