ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता; पाचोरा येथील प्रख्यात शिंदे हायस्कूल म्हणजेच कै. पी. के. शिंदे विद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच बदल मुख्यध्यापिका पदावर महिला श्रीमती सविता ताड यांच्यावर संस्थेचा विश्वास


अनेक वर्षापासून कार्यरत शिक्षिका श्रीमती सविता ताड या अध्ययन कर्तुत्व शिस्त आणि सेवाजेष्ठतेचा सन्मान या तत्त्वावरच संस्थेचा विश्वास पाचोरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात आपले कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल महाराष्ट्र कामगार दिवस 1 मे 2026 एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णयामुळे विशेष ठरला आहे अनेक वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन आणि आपली जबाबदारी विद्यार्थी प्रती आणि शाळेचा मान सन्मान काय असतो याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्या पहिले पासून अतिशय शिस्तप्रिय कार्यपद्धती जपणाऱ्या शिक्षिका श्रीमती सविता शशिकांत ताड अर्थात सर्वांच्या परिचयातील “दत्तू मॅडम” यांची कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ही केवळ नियुक्ती नाही तर शिक्षण क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या संघर्ष संयम आणि कर्तृत्वाचा सन्मान आहे. अनेकदा महिलांच्या कर्तृत्वाकडे दुय्यम नजरेने पाहणाऱ्या व्यवस्थेला हा निर्णय ठोस उत्तर देणारा ठरला आहे महिला फक्त शिकवू शकते नेतृत्व करू शकत नाही या जुनाट मानसिकतेला छेद देत संस्थेने एका अनुभवी अभ्यासू आणि विद्यार्थि प्रिय शिक्षिकेच्या हातात विद्यालयाची धुरा सोपविली आहे श्रीमती सविता ताड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयात अत्यंत निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार शिस्त आणि गुणवत्तेची पेरणी केली. त्यांचे अध्यापन हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे राहिले आहे. त्यामुळे “दत्तू मॅडम” हे नाव विद्यार्थ्यांमध्ये विश्वास मायेचा आधार आणि कठोर शिस्त यांचे प्रतीक बनले आहे.संस्थापक अध्यक्ष श्री तात्यासो पंडित शिंदे उपाध्यक्ष श्री निरज मुनोत, सचिव श्री दादासो जे. डी. काटकर, भाजपा युवा नेते अमोल शिंदे तसेच सहसचिव प्राचार्य शिवाजी शिंदे सर यांनी श्रीमती ताड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय पदांवर महिलांचे प्रमाण वाढत असले तरी ग्रामीण व निमशहरी भागात महिला मुख्याध्यापिका होणे हा अजूनही संघर्षाचा विषय मानला जातो. अशा परिस्थितीत कै. पी. के. शिंदे विद्यालयाने घेतलेला हा निर्णय अनेक महिला शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.एका शिक्षिकेच्या डोळ्यातील कष्टांचे अश्रू, विद्यार्थ्यांसाठी केलेली धडपड आणि आयुष्यभराची निष्ठा अखेर मुख्याध्यापिका पदाच्या रूपाने सन्मानित झाली आणि त्यांची नियुक्ती केवळ प्रशासकीय नसून स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा ठसा आणि सन्मान करणारी ठरली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button