ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यात ग्रामसभांचा खोळंबा चौकशी करून 8 दिवसांत सभा घेण्याची मागणी


भडगाव (प्रतिनिधी) विजय माळी
तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 2 ऑक्टोबर 2026 रोजी कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या ग्रामसभा झालेल्या नाहीत त्यांची सखोल चौकशी करून उर्वरित सर्व गावांमध्ये 8 दिवसांच्या आत ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा शाखेने केली आहे यासंदर्भात भडगावचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले शासकीय नियम आणि 73 व्या घटनादुरुस्तीनुसार 2 ऑक्टोबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसभा झाल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यातील किती आणि कोणत्या गावांमध्ये 2 ऑक्टोबरला ग्रामसभा झाल्या याची सविस्तर माहिती जाहीर करावी ज्या ग्रामपंचायतींमध्ये सभा झालेल्या नाहीत तेथे आठ दिवसांत सभांचे आयोजन करावे तसेच ग्रामसभा न होण्यामागील कारणे शोधून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस जगदीश प्रदीप शिंदे जिल्हा सहसरचिटणीस देविदास दौलत पाटील जिल्हा संघटक रुपेश निकम पाटील युवराज पाटील भूषण पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे जळगावचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी पाचोरा प्रांताधिकारी आणि भडगाव तहसीलदार यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button