वाहतूक कोंडी खड्डेमय रस्ते जनतेच्या कराच्या पैशातून सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याची विकासाची गंगा एकाच वर्षात बोगस कामगिरीचा पर्दाफाश जबाबदार कोण? रस्त्यांचे प्रकल्प पूलांचे कामे ठेकेदार काय समाजसेवा करतात का निस्वार्थ निशुल्क कार्य करत आहे का? महाराष्ट्र पुणे येथे जंगली महाराज रस्त्याला गेल्या 46 वर्षांमध्ये एकही खड्डा नाही त्या रस्त्यासाठी टक्केवारी नाही म्हणून टिकला

संपूर्ण देशात सार्वजनिक बांधकाम विभाग महत्वपूर्ण विभाग 20/25 वर्षापूर्वी टक्केवारी कमिशन एकदम कमी प्रमाणात होते कामे पण चांगली व्हायची त्यानंतर अनेक मोठे मोठे रस्ते पुल निर्माण करण्यासाठी सरकारने दळणवळणाची साधने निर्माण करून विकास साधला जाईल म्हणून कामे मंजूर केली परंतु जेवढ्या मोठमोठ्या कामात मोठी टक्केवारीत वाढ झाली तसे कमिशन टक्केवारी वाढली बांधकाम विभागात काम करणाऱ्या अभियंते क्लार्क यांना मोठ्या प्रमाणात सरकारी पगार दिला जातो सरकारी वेतन आयोगानुसार त्यांची भूमिका कशी असली पाहिजे स्वतः जाऊन कामाची पाहणी करणे तसे न झाल्यामुळे सरकारचे पुन्हा नवीन धोरण प्रायव्हेटी करण कॉन्ट्रॅक्टर कंपनी यांना मोठमोठे रस्त्यांचे पूलांचे कामे देण्यात आली पण त्याही कामात टक्केवारी जास्त असल्यामुळे एकच वर्षात मोठ मोठे पूल अचानक तुटले लाखो लोक मेले एक्सीडेंट झाले रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले त्या रस्त्याची गॅरंटी काय असते कॉलेटी क्वांटिटी काय असते अजून पर्यंत काही कॉन्ट्रॅक्टर यांना माहिती नाही का? जास्त टक्केवारी कमिशन खोरी वाढल्यामुळे त्या कामांची पूर्ण वाट लागली सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असो फक्त नावाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते टक्केवारी घेतल्याशिवाय सह्या करत नाही यात अनेक कारणे असून विरोधी पक्ष यांनी अनेक ठिकाणी अभियंता यांच्या बदली करण्यासाठी आंदोलन मोर्चे काढले काहींची बदली झाली पण येरे माझ्या मागल्या हीच पद्धत अजूनही सुरू आहे अन काय भ्रष्टाचार करून त्यांच्यावर एकही कार्यवाही होत नाही यांच्यामागे आशीर्वाद कोणाचा? त्यामुळे ते बिनधास्त सह्या करतात यामुळे वाहतूक कोंडी खड्डेमयर वारंवार जनतेला सहन करावे लागत असते आणि महागाई यातून मार्ग निघणार का नाही? जोपर्यंत कमिशन खोरी टक्केवारी बंद होणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार लोकशाही फक्त नावाला जिवंत ठेवली आहे भ्रष्टाचार करू नका तुमच्याकडे कोणीही येणार नाही तुमचा कारभार स्वच्छ निर्मळ आणि विक्रम करणारे कार्य असावे कारण रस्ते हे दळणवळणाची साधने प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण असतात म्हणून त्या रस्त्यांची कामे आपण लावलेल्या फलकानुसार अंदाजपत्रकानुसार टिकायला हवी त्यामुळे देशाचा विकास होऊन देशाचं उज्वल भविष्य सार्वजनिक बांधकाम विभाग करू शकतात आमदार खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्री सडक योजना यांच्या नावावर मंजूर होत असतात त्या मंजूर झालेल्या कामे जवळच्या पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टर यांनाच मिळते जवळचा कॉन्ट्रॅक्टर पक्षाचा असल्यामुळे त्याला बोलत नाही कॉन्ट्रॅक्टरांची लायसन त्याच्या कामाचा अनुभव कॉन्टिटी काहीच पाहिले जात नाही यामुळे जनतेच्या करांच्या पैसा मधून या पैशांची विल्हे वाट लावली जाते रस्त्यांचे पुलांचे कामे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर समाजसेवा म्हणून निस्वार्थ निशुल्क काम करीत आहे का? या ठेकेदारांची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज काय? विचार करण्यासारखी महत्त्वपूर्ण बाब आहे हे काय शेतामध्ये रात्रीचे नागर हाकला जातात का? अतिशय देशाची परिस्थिती गंभीर झाली असून लोकशाही संपवण्याचा घाट भ्रष्टाचारी लाच खोरी टक्केवारी कमीशन यामुळे होत असून देशाचा विकास बाजूलाच राहिला देशावर इतके मोठे कर्ज झाले आहे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सरकारी कर्ज दहा ते बारा लाख रुपये यावरून अंदाज करा देशात 130 कोटी जनता आहे






