जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील दर्जेदार शिक्षणासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था कटिबद्ध माजी आमदार दिलीप वाघ यांचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या प्रसंगी प्रतिपादन

दर्जेदार शिक्षणासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था कटिबद्ध माजी आमदार दिलीप वाघ यांचे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा प्रसंगी प्रतिपादन तालुका प्रतिनिधी शांताराम चौधरी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था पाचोरा भडगाव तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबंध आहे असे प्रतिपादन पाचोरा भडगाव विधानसभे चे माजी आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांनी श्री सेठ मुरलीधर जी मानसिंग का महाविद्यालय व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या प्रसंगी आपल्या अध्यक्ष भाषणात केले माजी आमदार दिलीप वाघ पुढे म्हणाले की आमच्या संस्थेमध्ये संचालकां मध्ये प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही तर सुसंवाद आहे सर्व संचालक मंडळ प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी हितासाठी सदैव नवीन उपक्रम राबवितात याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री व्ही टी जोशी यांनी संस्थेने विद्यार्थी हितासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला माजी विद्यार्थ्यांमध्ये सुनील वाणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे सचिव श्री पदमसिंग पाटील जॉईन डायरेक्टर आणि डेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया नवी दिल्ली युगंधारा पाटील एमपीएससी च्या ब गट वर्गातून इ डब्ल्यू एस मुलींमधून प्रथम श्री दीपक बाविस्कर प्राचार्य शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालय नाशिक शरद पाटील उपयुक्त जीएसटी मुंबई श्री शामकांत देवरे मराठी विश्वकोश मंडळ सचिव मुंबई भावेश जोशी एम एम आर डी ए मुंबई विद्या पाटील मुख्याधिकारी राहुल अमोल चौधरी मुख्याधिकारी व कुंभमेळा प्रमुख नाशिक उद्योजक सुशील खैरनार यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून आम्ही या सर्वांच्या ऋणात राहू माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र चिंचोले यांनी माजी विद्यार्थी संघाची भूमिका व वाटचाल व विविध उपक्रमांची माहिती दिली व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ अर्जुन दास पंजाबी खलील देशमुख डॉ जयंतराव पाटील सतीश चौधरी मधुकर पाटील दुष्यंत रावल वासुदेव महाजन प्रकाश पाटील प्रा भागवत मालपुरे पाटील प्रा राजेंद्र चिंचोले प्राचार्य डॉ वासुदेव वले उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील प्रा डॉ जे डी गोपाळ उपप्राचार्य डॉ सुनिता गुंजाळ प्रा डॉ प्राजक्ता शितोळेउपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचं व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत व सत्कार उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील प्रा डॉ जे डी गोपाळ उपप्राचार्य प्राध्यापिका डॉ सुनिता मांडोळे प्राध्यापिका डॉ प्राजक्ता शितोळे प्राध्यापिका डॉ क्रांती सोनवणे यांनी केला त्यानंतर उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ वासुदेव वले सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी आभार शांताराम चौधरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले











