ताज्या बातम्या

इस्लामपूर तालुका वाळवा बहे ग्रामसभेने केला ईव्हीएम मशीन नाकारण्याचा ठराव तहसीलदारांना निवेदनाची प्रत दिली त्यावेळेस सरपंच यांनी ईव्हीएम मशीन ची हेराफेरी करता येत असल्याने विकसित देशाने ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सुरुवात केली


इस्लामपूर येथील वाळवा तालुक्यातील बहे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवून ईव्हीएम मशीन लावल्यास बहिष्कार करण्याचा इशारा दिला आहे या गावाने यापुढील गावातील कोणत्याही संस्थेच्या किंवा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावेळी ईव्हीएम मशीनचा वापर करू नये असा ठराव ग्रामसभेने केला ग्रामसभेचा अवमान करून ईव्हीएम मशीन बळजबरी लादले गेले तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेण्यात आला बहे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संतोष दमामे यांच्या अध्यक्षतेखाली 1 जानेवारी 2025 रोजी ग्रामसभा घेतली होती या ग्रामसभेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे यांनी ईव्हीएम मशीन ला विरोध करण्यासाठी ठराव संमत केला त्या ठरावाला सयाजी पाटील यांनी अनुमोदन दिले ग्रामसभेत या ठरावावर चर्चा झाल्यानंतर यापुढे गावातील निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन चा विरोध केला जाईल ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेच्या स्वरूपात राबवावी असा ठराव सर्वानूमते करण्यात आला ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित होतो आपल्या निवडीच्या माणसाला मत दिल्यानंतर तो माणूस निवडून येत नाही याचा अर्थ षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतो मतदान देऊन काय फायदा होत नसेल तर लोकशाहीचा फायदा काय असा सवाल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे यांनी केला चंद्रावर उपग्रह सोडले जातात त्यांचे रिमोट कंट्रोल शास्त्रज्ञ पृथ्वीवरून सेट करतात तर ईव्हीएम मशीन मध्ये सेट करता येणार नाही का? असा सवालही त्यांनी केला आणि ती सेटिंग झाल्यामुळे येणारे उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेत पराभूत झाले सगळ्यांन गर्दी नव्हती तरीही कस काय निवडून आले हा चमत्कार कसा काय झाला? तहसीलदारांना या ठरावाची प्रत दिल्यानंतर सरपंच व सदस्य यांनी ईव्हीएम मशीन विषयी बोलताना सांगितले ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी करता येते जगभरातील अनेक विकसित देशांनी ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे बहे गावच्या नागरिकांनी संविधानात दिलेल्या हक्क अधिकाराच्या अनुसरून ग्रामसभेत ईव्हीएम मशीन नाकारण्याचा एकमुखाने ठराव केला या ठरावाची प्रत तहसीलदार यांना देण्यात आली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button