ताज्या बातम्या
जिल्हा धुळे येथील शिरपूरला श्री बालाजी महाराजांच्या भव्य रथोत्सवाचा पवित्र सोहळा भक्ति_ भावात संपन्न

श्री बालाजी महाराजांच्या भव्य रथोत्सवाचा पवित्र सोहळा भक्तिभावात संपन्न!श्री बालाजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज, गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी श्री बालाजी संस्थान, खालचे गाव, शिरपूर येथे भव्य रथोत्सवाचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.या पवित्र रथोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शन घेतले आणि महाराजांच्या चरणी श्रद्धा व भक्तिभावाने नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.श्री बालाजी महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच सर्वांना उत्तम आरोग्य व भरभराट लाभो, हीच श्री बालाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना!श्री बालाजी महाराज की जय ॥🙏









