बीड जिल्ह्यात गेवराईत ‘महिला संवाद अभियान माझी समस्या, माझा आवाज’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद सुमारे 250 महिलांची उपस्थिती; महिला सक्षमीकरणासाठी अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीचा पुढाकार

गेवराई, दि. 12 ऑक्टोबर 2026
अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या वतीने आयोजित ‘महिला संवाद अभियान – माझी समस्या, माझा आवाज’ या उपक्रमाला गेवराई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला सुमारे 250 महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव रेखा सोनोने आणि युवा शक्ती महिला प्रमुख उपस्थित जिल्हाप्रमुख रूपाली देशपांडे यांनी महिलांशी संवाद साधला.या वेळी महिलांचे शिक्षण, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन, कौटुंबिक समस्या, आरोग्य, कायदेशीर अधिकार, शासकीय योजना, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांवर चर्चा करण्यात आली. महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि त्यांच्या प्रश्नांना संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे रूपाली देशपांडे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गेवराईच्या अध्यक्षा वंदना महेश धुरंदर आणि ग्रामीण अध्यक्षा शांता लक्ष्मण उमाप यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांच्या सन्मानासाठी आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प महिला आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.










