जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील वडजी सजा अंतर्गत तलाठ्यांच्या कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक 8 दिवसांत कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा बदमाश गिरी जास्त वाढली आपले कामे करा अन्यथा_ राजीनामा द्या भडगावचे शेतकरी आक्रमक

भडगाव (प्रतिनिधी) : आबा महाजन 31 जुलै 2026 रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसासह शिवणी येथील जामदा कालवा फुटल्याने भडगाव तालुक्यातील वडजी सजा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असतानाही अद्याप अनेक बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यां मध्ये नाराजीचे वातावरण आहे.दरम्यान, नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय मराठा महासंघाने प्रशासनाकडे चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.निवेदनात वडजी सजेतील तलाठ्यांच्या काम काजाबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे वगळून, ज्यांच्या शेतात पिकेच नव्हती अशा व्यक्तींची नावे नुकसान भरपाईच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच संबंधित तलाठ्यांच्या अकार्यक्षम व बेजबाबदार कारभारामुळे अनेक पात्र शेतकरी भरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी अथवा कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.8 दिवसांचा अल्टिमेटम प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील आठ दिवसांत संबंधित तलाठ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा बाधित शेतकऱ्यांसह भडगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील, जिल्हा सरचिटणीस जगदीश शिंदे, जिल्हा संघटक पपेश पाटील, शेतकरी बाबाजी भाऊराव पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, सचिन सुभाष पाटील आणि भरत विठ्ठल परदेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, तसेच जिल्हाधिकारी जळगाव आणि प्रांत अधिकारी पाचोरा यांच्याकडेही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. भडगाव तालुका प्रतिनिधी
आबा महाजन (पत्रकार) भडगाव मो.9766073798











