जिल्हा जळगाव जिजाऊ ब्रिगेडची”आशिरगड”श्रावणसरी सहल मोठया उत्साहात _ _महिलांनी केला जल्लोष_

जळगांव : प्रतिनिधी येथील जिजाऊ ब्रिगेड यांची श्रावणसरी सहल मध्यप्रदेशातील 15 व्या शतकातील, सातपुडा पर्वतात वसलेला धार्मिक,पौराणिक, व ऐतिहासिक दृष्टीनेअत्यंत महत्वाचा आशिरगड किल्ला येथे नेण्यात आली. महिलांनी येथे अनेक नवीन गोष्टीची माहिती घेऊन रिमझिम पावसात, निसर्गरम्य वातावरणात सहलीचा आनंद घेतला.येथील निसर्ग सौंदर्य अगदी महाबळेश्वर सारखेच वाटत होते. विशेषतः या सहलीचे एक विशेष असे की, प्रवासात गाणे, कविता यासोबतच महिलांनी प्रमाण भाषा,बोली भाषा, भाषेमुळे होणारे समज,गैरसमज आणि उडणारा गोंधळ याविषयावर गमतीशिर तसेच शैक्षणिक, सामाजिक महिला विषयक व राजकीय अशा गंभीर विषयावर परिपूर्ण अशी चर्चा केली. खंत एकच वाटली की,या अतिशय सुंदर अशा ऐतिहासिक वारस्याचे जतन करण्यास, मध्य प्रदेश सरकार असमर्थ दिसत आहे.या सुंदर सहलीचा आनंद जिजाऊ ब्रिगेडच्या जळगांव शहरातील महिला लीना पवार,ज्योती पाटील,सुचिता पाटील, रश्मी कदम, सरिता पाटील,पल्लवी भोगे (पाटील ),अंजली बोरसे, वैशाली काळे,भारती भामरे, जयश्री पाटील,लीना पाटील, मनीषा पाटील, उज्ज्वला गरुड,शिव पाटील,करूणा पाटील,भारती पाटील, स्मिता निकम,दिपाली पाटील,मेघा जाधव यांनी घेतला.टेम्पो ट्रॅव्हलऱचे मालक चालक रोहित पाटील यांचे सहकार्य लाभले.











