युवतींनी मोठी स्वप्ने डोळ्यासमोर ठेवून ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. – हेमलताताई इंगळे(भालोद) भुसावल जिल्हा जळगाव

भुसावल प्रतिनिधी गोपी अण्णा
महाविद्यालयीन जीवनामधील जीवनामधील युवती सभेचे व्यासपीठ हे विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना विकसित करण्यासाठी असून व्यक्तिमत्व विकासाचा विकास करणारे ते महत्त्वाचे माध्यम आहे. युवतींनी आपल्या उज्वल भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे महत्त्वाचे आहे.असे प्रतिपादन सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोदच्या चेअरमन सौ. हेमलताताई मुरलीधर इंगळे यांनी केले त्या येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील युवती सभेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी.कोल्हे होते याप्रसंगी चेअरमन सौ. हेमलता ताई इंगळे म्हणाल्यात की ,” स्वराष्ट्र, स्वधर्म, स्वसंस्कृती, स्व भाषा आणि स्वाभिमान या पाच ‘स्व ‘चा अंगीकार करून विद्यार्थिनींनी आपले जीवन विकसित करावे . शिक्षणामधून एक आदर्श नागरिक म्हणून समाजासमोर आपले स्थान निर्माण केले पाहिजे. चांगले विचार आणि चांगले संस्कार हे व्यक्तीला आनंदी जीवन देत असतात अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. कोल्हे सरांनी “महाविद्यालयातील युवती सभेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना परस्परांच्या विचारांची देवाण घेवाण होऊन स्वाभिमानासोबत युवतींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आपल्यातील नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी व जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवावे असा संदेश विद्यार्थिनींना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी वाघुळदे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी युती सभेची उद्दिष्टे व आगामी उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थिनींनी या उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कु . हेमांगी महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.कु. हेमांगी इंगळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. आशुतोष वर्डीकर, युवती सभेच्या समिती सदस्या प्रा.सौ. मोहिनी तायडे ,प्रा.सौ. गीतांजली चौधरी, प्रा. सौ. भावना प्रजापती , प्रा. जान्हवी परतणे , प्रा. फाल्गुनी राणे, प्रा. मानसी महाजन , प्रा.सौ. हंशाली महाजन महाविद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती.











