निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जळगाव यांनी ड्राय डे 15 ऑगस्ट या दिवशी अवैध डुबलीकेट दारू विक्रीसाठी वरखेडी परिसरात येत असते ही गुप्त माहिती मिळाल्यावर भरारी पथक जळगाव दबंग अधिकारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव मा; अशोक प्र तारू साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट देशी दारू इनोव्हा कार सह मुद्देमाल जप्त केला पाचोरा येथील दारूबंदी दुय्यम निरीक्षक संजय कुटे यांची कामगिरी निष्क्रिय झालेली आहे पाचोरा ऑफिस फक्त नावाला आहे पत्रकारांना कधी सन्मान देणार नाही धुळ्यातील प्रकरण पुढच्या आवृत्तीमध्ये नक्की पहा ग्राउंड रिपोर्ट

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जळगाव यांना दिनांक 14/8/2026 रोजी गुप्त माहिती मिळाली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरात डुबलीकेट दारू (बनावट) कायमस्वरूपी येत असल्यामुळे दबंग अधिकारी अशोक तारू साहेब यांनी तो परिसर पिंजून काढला त्यानंतर वरखेडी येथे गुरांचा बाजारात जवळच एक ढाबा असून त्या ठिकाणी नेहमी डुप्लिकेट दारू दाढी विकली जाते हे पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या अंडर मध्ये असून पिंपळगाव पोलीस स्टेशन करते तरी काय? त्यानंतर डीवायसी पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्याकडे जामनेर विभाग असल्यामुळे त्यांचे त्या परिसरात नेहमी जाणे येणे असते त्यानंतर पहूर परिसरात सगळ्यात मोठा जुगाराचा अड्डा प्रख्यात आहे लांबून लांबून पत्ते खेळण्यासाठी येत असतात तेही फोरविलर मध्ये येतात याकडे डी वाय एस पी साहेब कधी लक्ष देणार अखेर भरारी पथक जळगाव यांनी वरखेडी परिसरात दिनांक 15 ऑगस्ट ड्राय डे च्या दिवशी छापा मारला आणि तो सक्सेस झाला टोयाटो कंपनीची इनोव्हा क्रिस्टा MH11 C1709 या चार चाकी कार गुरांच्या बाजाराकडे जात असताना त्या वाहनाला थांबवण्यात आले त्या वाहनाच्या ड्रायव्हरला विचारले असता गाडीत काय आहे त्याने लगेच उडवा उडवी चे उत्तर दिले त्यामुळे संशय अधिक बळावला वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट देशी दारू टॅंगो पंच 90 मि लि चे 25 बॉक्स मिळून आले आरोपीच्या ताब्यातून चार चाकी कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा क्रमांक 278 /2026 दाखल करून मे; पाचोरा कोर्टात हजर करण्यात आले त्यानुसार कार्यवाही एकूण मुद्देमाल बनावट देशी दारू 225 ब ली 25 बॉक्स, क्रिस्टा इनोवा कार फोर व्हीलर चार मोबाईल संच, जप्त मुद्देमाल एकूण 11,45,000 आरोपींची नावे पुढीलप्रमाणे 1) आरिफ राजू तडवी वय वर्ष 29 राहणार लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा 2) अनिल खंडू भोई वय वर्ष 51 राहणार वरखेडी तालुका पाचोरा 3) मुकेश सुभाष कोळी वय वर्ष 30 राहणार पिंप्राळा तालुका जिल्हा जळगाव 4) अनिल शिवराम महाजन वय वर्ष 44 राहणार हरी विठ्ठल नगर जिल्हा जळगाव निरीक्षक दारू उत्पादन शुल्क विभाग जळगाव जिल्हा दारूबंदी अधीक्षक मा: प्रदीप पोटे सो, चाळीसगाव मा: के एन गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव मा: वाय वाय सूर्यवंशी दुय्यम निरीक्षक के डी वराडे डी बी पाटील एन व्ही पाटील आयबी बाविस्कर जवान एन बी पवार आर पी सोनवणे डी एस पावरा जी डी सूर्यवंशी पूनम पाटील जी डी अहिरे व्ही टी हटकर वाय एस राठोड आरडी जंजाळे पी पी तायडे एस डी पाटील के पी सोनवणे एन आर ननवरे यांनी सहकार्य केले पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जळगाव मा: अशोक प्र तारू साहेब करीत आहे










