ताज्या बातम्या

एक हात मदतीचा…दान अशा ठिकाणी करा पूरग्रस्तांना भूकंपग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती जनक ग्रस्तांना// दान देणारा हा महत्वपूर्ण असतो ज्यांच्याजवळ लाखो करोडो रुपये पडलेले आहेत पण त्यांची इच्छा होत नाही त्यांचा जन्म घेऊन काही फायदा नाही दान देणाऱ्या व्यक्तीला कधीच कमी पडत नाही कर्म चांगले करा चांगले फळ भेटते आज बहाळ, खेडगाव आणि भवाळी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 200 हून अधिक कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन जीवना_ वश्यक व संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.


चाळीसगावचे आमदार मंगेश दादा यांनी काल नुकसान पाहणी करताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत भीती, वेदना आणि उद्याची चिंता पाहिली. त्या वेळी मी दिलेला शब्द आज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ही मदत मोठी नाही, फुल ना फुलाची पाकळी म्हणून संकटात असलेल्या माझ्या चाळीसगाव वासियांसाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. चाळीसगाव माझ्यासाठी फक्त मतदारसंघ नाही, हे माझे कुटुंब आहे. चाळीसगाव तालुक्यातील कुणीही व्यक्ती उपाशीपोटी राहत असेल, संकटात असहाय उभी असेल, तर त्याचे सर्वात जास्त दुःख मला होते.गरिबी मी जवळून पाहिली आहे. कष्ट काय असतात, उद्याच्या भाकरीची चिंता काय असते, याची जाणीव मला आहे. म्हणूनच या संकटाच्या काळात प्रत्येक गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.शासनाकडून देखील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे कटीबद्ध आहे. पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक महापूरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button