जिल्हा जळगाव तालुका पाचोरा रामेश्वर तांडा गट क्र. 69/अ/ वाद पुन्हा ऐरणीवर; निष्पक्ष चौकशी न झाल्यास 3 ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा! जिल्हा परिषद सीओ अधिकारी यांना निवेदन

रामेश्वर तांडा (ता. पाचोरा) येथील गट क्रमांक 69 /अ ही शासकीय जमीन संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना” अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा जळगाव जिल्हा परिषद सीओ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ही प्रलंबित मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या प्रश्नावर गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.गोर सेना व रामेश्वर तांडा ग्रामस्थांनी संबंधितअधिकाऱ्यांकडे यापूर्वी अनेक तक्रारी व निवेदने दिली असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे निवेदनानुसार, गट क्र. 69/अ बाबत यापूर्वी शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव आणि इतर शासकीय पत्रव्यवहार झालेला असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास 3 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.















