“सायकल वारीतून सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जळगावच्या महापूर दीपमाला काळे !”जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा कार्यकाळ 1608_1650 महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदाय संपूर्ण जगाला अज्ञानाकडून विज्ञानाकडे घेऊन जाणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांचे गुरु विठुराया बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

मनोगत : महापौर दीपमाला काळे”लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी दि. 9 ते 11 जुलै 2026 दरम्यान जळगाव ते पंढरपूर हा प्रवास सायकलने करण्याचा संकल्प मी केला आहे. माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष आहे. माझ्यासाठी ही केवळ धार्मिक वारी नसून, एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारी चळवळ आहे गेल्या 153 दिवसांत जळगाव शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करताना मी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. हीच विकाससूत्री पुढे नेण्यासाठी या सायकल वारीच्या माध्यमातून मला जळगावकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला ‘सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन’ हा संदेश द्यायचा आहे. सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तर उत्तम राहतेच, शिवाय इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते. विठ्ठलाच्या चरणी लीन होताना, मी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, माझ्या शेतकरी बांधवांच्या सुखासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घालणार आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी जे ‘विकास व्हिजन’ आम्ही हाती घेतले आहे, त्याला बळ मिळावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना असेल. जळगावकरांचे प्रेम आणि विठू माऊलींचा आशीर्वाद यांच्या जोरावर ही सायकल वारी निश्चितच यशस्वी होईल, हा मला पूर्ण विश्वास आहे।। रामकृष्ण हरी ।। जय हरी विठ्ठल !!”












