प्रसारमाध्यमाच्या कलमवीर यांच्या दणक्यामुळे NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील महाराष्ट्र न्यूज व साई प्रेरणा या माध्यमातून न्यूज प्रसारित झाल्यामुळे प्रशासनाला अखेर हार मानवी लागली आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयाकडून ‘तो’ ऐतिहासिक शासकीय अभिलेख गहाळ केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या अर्ध नग्न आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ 2005 पासूनचे शासकीय रेकॉर्ड गायब करणाऱ्या ‘त्या’ अज्ञात कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार पंचायत समितीमधील मृत्यू नोंदीवरील फेरफार प्रकरणाकडेही आता संपूर्ण जनतेचे लक्ष

गेल्या वर्षभरापासून महसूल, ग्राम प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे सक्षम पुराव्यांसह पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने, अखेर सामाजिक कार्यकर्ते पंकज राजेंद्र पाटील यांनी ‘अर्ध नग्न आंदोलनाचा’ पवित्रा घेतला. या आंदोलनाच्या इशाऱ्याने जिल्हास्तरीय आणि तालुका प्रशासनात एकच खळबळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, पाटील यांच्या दोन प्रमुख मागण्यांपैकी महसूल विभागाशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरणात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे मुख्य प्रकरण? मौजे तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील गट क्र. 172 व 24 मधील फेरफार नोंद क्र. 909 (सन 2005) च्या वाटणी पत्राची मूळ संचिका आणि आदेश हा ‘अ’ वर्गाचा कायमस्वरूपी जतन करण्याचा शासकीय अभिलेख आहे. तक्रारदार पंकज पाटील यांनी या मूळ संचिकेच्या प्रमाणित प्रतीची मागणी केली होती. मात्र, तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष, फेरीस्त नोंदवही, रेकॉर्ड हस्तांतरण रजिस्टर, न्यायालयीन संचिका आणि गाव नमुना क्र. 6 ची सखोल तपासणी करूनही हा महत्त्वाचा मूळ दस्तऐवज कोठेही आढळून आला नाही.नायब तहसीलदार (महसूल), मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करून खुलासे मागवण्यात आले. शासकीय मालमत्ता असलेला हा कायमस्वरूपी अभिलेख गायब होण्यात अक्षम्य निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल!हा प्रकार केवळ विभागीय चौकशीपुरता मर्यादित न ठेवता फौजदारी तपासास पात्र असल्याचा निष्कर्ष काढत, मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार विनोद बबनराव कुमावत (वय 55) यांनी स्वतः पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गु.र.नं. 322/2026 अन्वये शासकीय रेकॉर्ड गायब करणाऱ्या अज्ञात कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2005 पासून आजतागायत कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी, अभिलेखापाल आणि रेकॉर्ड हस्तांतरणाशी संबंधित व्यक्तींची आता पोलीस कसून चौकशी करणार आहेत.दुसऱ्या मागणीबाबत लेखी आश्वासन; आंदोलनाची सांगता पंकज पाटील यांची दुसरी प्रमुख मागणी पाचोरा पंचायत समिती मधील मूळ मृत्यू नोंदीवर अनधिकृतपणे मारलेल्या ‘गुणाकाराच्या फुली’ संदर्भातील गंभीर फौजदारी गुन्ह्याबाबत होती. यावरही प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दाखवलेली संवेदनशीलता आणि गरिमाचा आदर राखत पंकज पाटील यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याची घोषणा केली.”गुन्ह्याच्या पहिल्याच टप्प्यात तपास अधिकाऱ्यांनी मुख्य तक्रारदार म्हणून माझा जबाब आणि माझ्याकडील सबळ पुरावे विचारात घेतले, तर या गुन्ह्यातील ‘अज्ञात’ आरोपी नक्कीच ‘ज्ञात’ होऊन समोर येतील. प्रशासनाने एका मागणीवर गुन्हा दाखल केला आहे, आता पाचोरा पंचायत समितीमधील मृत्यू नोंदीच्या गंभीर प्रकरणातील फौजदारी कारवाईकडे माझ्या संपुर्ण जनतेचे लक्ष लागून आहे.”— पंकज राजेंद्र पाटील (मूळ तक्रारदार)आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील सहकारी, कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे (कलम वीर ,सिटी न्यूज 85, सिटी महाराष्ट्र न्यूज व साई प्रेरणा) पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. शासकीय रेकॉर्ड गायब करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले असून पोलीस आता नेमका कोणाचा ‘गेम’ उलघडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










