अग्निशामक अधिकारी जळगाव शहर महानगर पालिका जळगाव शहरातील खाजगी कोचिंग सेंटर लायब्ररी मोठे व्यावसायिक संकुले यांचे अग्निशमन फायर ऑडिट ना_ हरकत दाखला घेणे अत्यावश्यक महापौर दीपमाला काळे यांचे आदेश

जळगाव शहरातील खाजगी कोचिंग सेंटर लायब्ररी मोठे व्यावसायिक संकुले यांचे अग्निशमन फायर ऑडिट व ना हरकत दाखला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेणे अत्यंत आवश्यक असून उपरोक्त विषयांद्वारे कळविण्यात येते की नुकतेच लखनऊ शहरात एका मोठ्या व्यावसायिक संकुलातील खाजगी कोचिंग सेंटर लायब्ररीच्या स्टुडिओमध्ये आग लागून सुमारे 15 विद्यार्थी आगीमध्ये होरफळून निघाले ही फार मोठी दुर्दैवी घटना झाली तसेच या घटनेबाबत चौकशी केली असता सदर या हॉटेलला अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले असून सदर ही बाब नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याची असून प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका यांनी चौकशी करून उपरोक्त घटना घडू नये म्हणून अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखला त्यामुळे पुढच्या संभाव्य घटना घडणार नाही आपण सुद्धा त्यादृष्टीने गांभीर्याने काळजी घ्यावी उपरोक्त घटना जळगाव शहरांमध्ये घडू नये म्हणून जळगाव शहरातील व ग्रामीण परिसरातील खाजगी कोचिंग सेंटर लायब्ररी मोठे व्यावसायिक संकुले यांचे अग्निशमन परीक्षण फायर ऑडिट करणे अत्यंत_आवश्यक आहे याद्वारे आपणास सूचित करण्यात येते की जळगाव शहरातील खाजगी कोचिंग सेंटर लायब्ररी मोठे व्यावसायिक संकुले यांना अग्निशामक विवाह कडून ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे किंवा कसे दिले आहे याबाबत सविस्तर माहिती इकडे कार्यालयात सादर करावी तसेच त्यांचे त्वरित अग्निशमन परीक्षण फायर ऑडिट करावे असे पत्र जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सुचित केले आहे














